वेध माझा ऑनलाइन - मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात केली. यानंतर या निर्णयावरुन अनेक मतमतांतर येत आहेत. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरे द्यायला नकोत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून आमदारांना घरं द्या : शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या, अशी पवारांची भूमिका आहे. लवकरच शरद पवार या विषयवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शरद पवारांचा सरकाराला घरचा आहेर अशी विरोधकांची टीका होत आहे, या टीकेला मी किंमत देत नाही, असे देखील शरद पवारांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment