Wednesday, March 16, 2022

दरवर्षी शेकडो जणांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या भाऊंना त्यांच्या वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा...

वेध माझा ऑनलाइन - येथील सामाजिक कार्यकर्ते व अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शहर अध्यक्ष प्रकाश जाधव मेहरबान यांचा आज वाढ दिवस साजरा होतोय...त्यानिमित्ताने...

प्रकाश जाधव भाऊ हे मेहेरबान म्हणून  सगळ्या गावात व भागात परिचित आहेत...कराड दक्षिण मध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे दिवंगत काँग्रेस नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे ते विश्वासू म्हणून परिचित आहेत तसेच कराड शहरातील नेते माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांचेही ते खंदे व कट्टर समर्थक आहेत...समाजात अनेकजण असतात की ज्यांना इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करून त्यात ते आपला आनंद शोधतात...त्याच धाटणीचे भाऊ आहेत असे अभिमानाने म्हणावे लागेल...कारण ते शहर व परिसरातील अनेक युवकांचे  वाढदिवस स्वतः त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना बोलावून घेऊन आठवणीने साजरे करतात...आणि समोरच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद देत त्याच्या चेहऱ्यावर समाधान पेरण्याचा प्रयत्न करतात...अशा माध्यमातून इतरांना खुशी देण्याचे हे काम ते अनेक वर्षे झाली करत आहेत... आज त्यांचा वाढदिवस साजरा होतोय... आजपर्यंत त्यांनी शेकडो जणांचे वाढदिवस साजरे केले आहेत...म्हणजे...अक्षरशः ज्याचा वाढदिवस आहे त्यालाही काही वेळा माहीत नसते की आज आपला वाढदिवस आहे...त्याचा फोटो आठवणीने फेसबुकवर किंवा इतर सोशल मिडियावर टाकून प्रकाशभाऊ त्या व्यक्तीला व त्या व्यक्तीच्या संबंधीत मित्रवर्गाला त्यांच्या वाढदिवसाची आठवण करुन देतात...मग त्या व्यक्तीला इतरांच्या शुभेच्छा येऊ लागतात... भाऊ स्वतः त्या व्यक्तीचा वाढदिवस केक व एखादा आकर्षक बुके देऊन साजरा करतात...असा रोज ते कोणाचा ना कोणाचा वाढदिवस अनेकवर्षं झाली आठवणीने साजरा करताना दिसतातच...शहरात त्यांचे अनेकजण अनुकरण करण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतात...प्रेमाने केलेल्या गोष्टी पैंशात मोजता येत नाहीत हे जरी खरे असले...तरी रोज कोणाचा ना कोणाचा वाढदिवस साजरा करताना भाऊ वर्षाला यासाठी हजारो रुपये खर्च करतात...कोणताही हेतू कधीही स्वतःच्या स्वभावात न डोकावू देणारे भाऊ स्वतः देखील नेहमी हसतमुख असतात...उत्साहाने बोलतात...शेकडो जणांचे वाढदिवस दरवर्षी साजरे करणाऱ्या भाऊंचा आज वाढदिवस साजरा होतोय याचा विशेष आनंद आहेच...भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐

No comments:

Post a Comment