Thursday, March 24, 2022

यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही ;

वेध माझा ऑनलाइन - देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थितीसह शाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.. मात्र यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना मुकावं लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment