Wednesday, March 30, 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी ; गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार ; ना राजेश टोपेंची माहिती

वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. त्यामुळे निर्बंध बरेच कमी करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही घरीच साजरी करण्यात आली आहे. पण, यंदा आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि सण उत्सवाबद्दल माहिती दिली.

ते म्हणाले ,राज्य सरकारने जे काही निर्बंध लावले होते, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडत असतो. त्यानंतर मास्क मुक्त असेल किंवा सोशल डिस्टसिंगचे नियम असो, त्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मास्क लगेच हटवले जाणार नाही.  कारण कोरोनाची लाट जरी ओसरली असली तर धोका अजूनही कायम आहे. जर कुणी बाधित असेल तर त्यामुळे इतर लोक बाधित होऊ शकतात, त्यामुळे घाईघाईने मास्क बंदी हटवली जाणार नाही, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.
गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही घरीच साजरी करण्यात आली आहे. पण, यंदा आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचं आम्ही सर्वांनी स्वागत केलं आहे. तर गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment