Sunday, March 20, 2022

नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले ; आमदार श्वेता महाले यांचे वादग्रस्त विधान ...

वेध माझा ऑनलाइन - भाजप आमदार श्वेता महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले असून आणि त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे आले आहेत,असं वादग्रस्त विधान श्वेता महाले यांनी केलं आहे. इतकंच काय तर श्वेता महाले यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

टीव्ही 9 ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. शिवसेनेचं  हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली, असं वादग्रस्त वक्तव्यही श्वेता महाले यांनी केलं आहे.  एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जात असून योजना दिल्या जात आहेत. ज्या हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले ते हिंदुत्व मात्र पक्षप्रमुख विसरले असल्याची टीका श्वेता महाले यांनी केली आहे.
नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मलिकांच्या अटकेला जवळपास महिना झाला आहे. यावरुन भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीनं मलिकांचा राजीनामा घेण्यासाठी नकार दिला असून सध्या त्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment