वेध माझा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू राहणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू राहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुलांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचं वेड असतं. बऱ्याचदा वर्षभरापासून कुटुंबात त्याचं प्लानिंग सुरू असतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत असं करीन..उन्हाळ्याच्या सुट्टीत तसं करूया...अशी अनेक तयारी सुरू असते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीमुळे विद्यार्थी हिरमुसले होते. मात्र शिक्षण आयुक्तांच्या अपडेटमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एका वृत्त वाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
No comments:
Post a Comment