वेध माझा ऑनलाईन - गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत प्रमोद सावंत यांच्याकडे यापुढेही राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच सावंत हे गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. गोव्यातील भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. हे सर्वांनी मान्य केले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आल्याच्या 11 दिवसांनंतर ही बैठक झाली. भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन हे भाजप विधिमंडळ पक्षनेते निवडीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आज दुपारी येथे दाखल झाले.
No comments:
Post a Comment