Thursday, March 17, 2022

नवाब मलिक यांच्याविषयी शरद पवार घेणार मोठा निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी आपल्या प्रमुख नेते आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मलिक यांचा राजीनामा न घेता खात्याचा कारभार दुसऱ्या नेत्याकडे सोपवण्यात यावा अशी चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली.


आज सकाळपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठका सुरू आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे मोजकेच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.  प्रफुल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे,  छगन भुजबळ यांच्यासह सुप्रिया सुळे बैठकीत हजर आहे. या बैठकीमध्ये मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा, पेनड्राईव्ह प्रकरणात राष्ट्रवादी नेत्यांची नावं आल्यानं पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईला नवा राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष मिळणार आहे.  नवाब मलिक यांच्या जागी नव्या कार्याध्यक्षाची निवड होणार आहे.  तर मंत्रीपद राजीनामा विषय स्थगित होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.  मात्र, त्यांच्याकडील खात्यांचा कारभार इतर कोणाला द्यावा का ? कार्यभार इतर कोणाला देण्याबाबत चर्चा झाली. कामं खोळंबू याकरिता हा निर्णय घ्यावा, अशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. पण, मलिक यांचे प्रकरण हे भाजपने मुद्दामहुन काढले आहे, त्यामुळे मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीने फेटाळून लावली होती. मलिक यांच्या प्रकरणात न्यायालयात लढा देणार अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती.

No comments:

Post a Comment