वेध माझा ऑनलाइन - आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरनं किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतरही देशात काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यानंतर क्रूड ऑईलच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment