वेध माझा ऑनलाईन - मार्च महिना सुरू होताच महाराष्ट्रासह मध्य भारतात अनेक ठिकाणी सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. ठाण्यात कमाल तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या शरीराची लाहीलाही झाली होती.दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता असूूून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार अशी शक्यता आहे
दरम्यान, अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची घट झाली. पण राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 20 अंशाहून अधिक नोंदला गेला. तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात देखील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. दरम्यान आज, उद्या ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार अशी शक्यता आहे.
No comments:
Post a Comment