वेध माझा ऑनलाइन - कारला डम्परने मागून धडक दिल्याने मलकापूर (ता;कराड) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पेठ - सांगली रस्त्यावर गाताडवाडी नजीक शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरचे व्यावसायिक अधिकाराव पोळ पत्नी सुषमा भावजय सरिता सुभाष पोळ आई गीताबाई (सर्व रा. पोळ वस्ती मलकापूर-कऱ्हाड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात पुतणी थोडक्यात वाचली हे कुटुंबिय घरगुती कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले
No comments:
Post a Comment