Friday, March 25, 2022

महागाईचा भडका ; -आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये १ एप्रिलपासून होणार वाढ ;

वेध माझा ऑनलाइन - इंधन दरवाढ सुरू असताना आता औषधांच्या किमतीदेखील वाढणार आहेत. आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार आहेत. जवळपास ८०० औषधांचे दर १० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं महाग होणार आहे.

उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं महागणार आहेत. वेदनाशामक आणि एँटी बायोटिक फिनायटोईन सोडियम, मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांवरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीनं (एनपीपीए) सांगितलं.
 
औषधांच्या किमती वाढवल्या जाव्यात अशी मागणी कोरोना संकट आल्यापासून या क्षेत्रातील कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आवश्यक औषधांच्या किमती वाढतील. कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दरही वाढणार आहेत.

No comments:

Post a Comment