Wednesday, March 30, 2022

उदयनराजेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर शिवेंद्रराजेंनी काय दिले उत्तर? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे यांच्यात चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली. दोन्ही राजे दंड थोपटून एकमेकांसमोर उभे असलेले पहायला मिळाले. आताही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमावर शिवेंद्रराजेंनी जोरदार आरोप केले होते. उदयनराजेंची झालेली एण्ट्री यावर तर शिवेंद्रराजेंनी चांगलाच समाचार घेतला होता. असं असलं तरी या आधी वाढदिवसाला दोन्ही बंधू एकमेकांना कायम शुभेच्छा देताना पहायला मिळालेत. मात्र, यावेळी चाललेल्या राजकीय गरमागरमीमुळे दोन्ही राजे शुभेच्छा देण्यापासून अलिप्त राहिले.
उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर मला कोणीच फोन केला नाही. मला शुभेच्छा दिल्या नाहीत, असं उत्तर शिवेंद्रराजेंनी दिलं. दोन्ही राजेंच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने भावांमधील नात्यातली दरी वाढल्याचं पहायला मिळालं. 

उदयनराजेंनी 'चला हवा येवू द्या', 'बैलगाडी शर्यत', 'रिक्षा स्पर्धा' असे अनेक कार्यक्रम घेतले होते. या सर्व कार्यक्रमांना लाखो लोकांची उपस्थिती होती. परंतु, उदयनराजेंच्या या कार्यक्रमांवर आमदार शिवेंद्रराजेंनी टिका केली होती.

उदयनराजेंच्या हवेतून झालेल्या एण्ट्रीवर टीका करत ज्यांची कामच हवेत असतात ते हवेतच राहणार असं वक्तव्य केल‌ं होतं. यावरुन दोन्ही राजेंमध्ये चांगलच घमासान रंगलं. उदयनराजेंच्या झालेल्या जंगी वाढदिवसानंतर शिवेंद्रराजे कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणार याबाबत साताऱ्यात अनेक चर्चा रंगल्या होत्या.
आमदार शिवेंद्रराजे हॅलिकॉप्टरमधूनच एण्ट्री करणार अशा चर्चांना चांगलच उधान आलं होतं. मात्र, शिवेंद्रराजेंनी वाढदिवस साधेपाणाने साजरा करत सगळ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. परंतु, उदयनराजेंचा शुभेच्छा देण्यासाठी साधा फोनही आला नाही असंही शिवेंद्रराजेंनी सांगितलं आहे.


No comments:

Post a Comment