वेध माझा ऑनलाइन - कोरोना महासाथीचं थैमान अद्यापही संपलेलं नाही. पण तरी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कोरोना निर्बंधही हळूहळू शिथील करण्यात आले पण चेहऱ्यावरील मास्क काही हटला नाही. काही प्रमाणात सूट देण्यात आली तरी मास्क बंधनकारक होते त्यामुळे या मास्कपासून सुटका कधी मिळणार असंच सर्वांना वाटत होतं. अखेर तो दिवस आला. गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली आहे.
ज्याची प्रतीक्षा सर्वांना होती, ती बातमी नववर्षाच्या आधीच आली आहे. गुढीपाडव्याआधी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांची मास्कमुळे होणारी कोंडीही सोडवली आहे. नागरिकांना मास्क फ्री करून राज्य सरकारने नागरिकांना नववर्षाचं सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment