Thursday, March 17, 2022

आता आला एक नवीन व्हेरिएंट; डेल्टाक्रॉन हा आहे नवीन व्हेरिएंट ; डेल्टा आणि ओमायक्रॉनचा बनलेला हा संकरित व्हेरिएंट असल्याचे झाले निष्पन्न...

वेध माझा ऑनलाइन - कोरोना व्हायरसला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. एकामागून एक नवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. डेल्टा आणि ओमायक्रॉन नंतर आता डेल्टाक्रॉनचे नवीन व्हेरिएंट आले आहेत. हा डेल्टा आणि ओमायक्रॉनचा बनलेला एक संकरित व्हेरिएंट आहे. डेल्टाक्रॉनची काही प्रकरणे ब्रिटनमधून नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य तज्ज्ञ आणि लोकांची चिंता वाढली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अहवाल दिला आहे की, या नवीन डेल्टाक्रॉन व्हेरिएंटची काही प्रकरणे काही युरोपियन देशांमध्ये, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेली आहेत.

डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्र प्रकार

अहवालात असं म्हटलं आहे की, डेल्टाक्रॉनची अनुवांशिक पार्श्वभूमी डेल्टा व्हेरिएंटसारखीच आहे. तसेच काही उत्परिवर्तन जसे की ओमायक्रॉन. त्यामुळे त्याला 'डेल्टाक्रॉन' असं नाव पडलं आहे. ओमायक्रॉनचे वर्णन आतापर्यंतचा सर्वात वेगानं पसरणारा कोरोना व्हेरिएंट आहे, तर डेल्टा व्हेरिएंटनं गेल्या वर्षी अनेक देशांमध्ये कहर केला होता.

ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये डेल्टाक्रॉनची प्रकरणे नोंदवली जात आहेत. पण सध्या तरी भारतात त्याची प्रकरणे दिसलेली नाहीत. दरम्यान काही प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन आणि डेल्टाचे मिश्रित संक्रमण निश्चितपणे पाहिले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची कोरोना व्हायरसच्या या व्हेरिएंटबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत या नवीन व्हेरिएंटच्या अहवालांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment