Tuesday, March 22, 2022

कराडचे डॉ नचिकेत वाचासुंदर "अक्कलकोट भूषण' पुरस्काराने सन्मानित...आयुर्वेद व पंचकर्मच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल झाला सन्मान...


वेध माझा ऑनलाइन - 
येथील सुपरिचित पंचवेद पंचकर्म आयुर्वेदिक हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ नचिकेत वाचासुंदर याना अक्कलकोट भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे अक्कलकोट येथील हुतात्मा अपंग बहुद्देशीय संस्थेच्यावतीने आयुर्वेद व पंचकर्मच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  डॉ  वाचासुंदर यांचा हा सत्कार करण्यात आला आहे

अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ मठाचे प पू अण्णा महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ वाचासुंदर याना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वटवृक्ष संस्थांनचे अध्यक्ष महेश इंगळे तसेच अग्निहोत्र फाउंडेशनचे डॉ पुरुषोत्तम राजिमवाले आणि अपंग बहुद्देशीय संस्थेचे डॉ सुनील फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक सांस्कृतिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यांनाही यावेळी गौरवण्यात आले 

 डॉ नचिकेत वाचासुंदर यांनी आयुर्वेद व पंचकर्माच्या माध्यमातून हजारो रुग्णांची यशस्वी उपचारसेवा करीत कराड परिसर तसेच ग्रामीण भागात आयुर्वेद व पंचकर्माचा प्रसार व प्रचार केला आहे त्यांनी आयुर्वेद विद्यार्थी व वैद्यांसाठी व्यवहारीक पंचकर्म विज्ञान या ग्रंथाची निर्मिती करून आयुर्वेद व पंचकर्म विषयामध्ये मोठे काम देखील केले आहे या एकूणच कार्याची दखल घेत डॉ वाचासुंदर त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे

स्वामी समर्थांच्या पवित्र आणि पावन भूमीत मिळालेला पुरस्कार म्हणजे साक्षात स्वामी समर्थांचा आशिर्वादच असल्याची  भावना यावेळी डॉ वाचासुंदर यांनी बोलून दाखवली

No comments:

Post a Comment