वेध माझा ऑनलाईन - भाजपने शिवसेनेच्या बाबतीत जे वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती. भाजप ज्या पद्धतीने केंद्रीय संस्थांचा वापर करून त्रास देत आहे. त्यामुळे संबंध ताणले आहे, त्यामुळे परत भाजप-सेना युतीच्या प्रश्न येत नाही' शिवसेना इतर पक्षासारखे नाही एकदा भूमिका घेतली घेतली, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसोबत युतीची चर्चा फेटाळून लावली.
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केले आणि संघाने स्वत: मुस्लीम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. त्यामुळे पडळकर किंवा भाजप नेते मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का? असा परखड सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.
'दहशत शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. शिवसेना असाा पक्ष आहे, तिथे हे शब्द चालत नाही. खोटे आरोप करणे हा बॉम्ब आहे का? मी ईडीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं 13 पानी पुराव्यासह सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे. तो बॉम्ब नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.
No comments:
Post a Comment