वेध माझा ऑनलाइन - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल. तसंच, स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या 3 महिन्यांत लागू होणार आहे महामार्गावरचा प्रवास आगामी काळात स्वस्त होणार आहे. कारण सरकारला यासंबंधी काळजी वाटत असून त्यादृष्टीनं आराखडाही तयार करण्यात आला आहे. सरकार ठराविक अंतराच्या मर्यादेत एकदाच टोल वसूल करेल. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल. तसंच, स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या 3 महिन्यांत लागू होणार आहे.
अनेक टोलनाके बंद होतील
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोलनाक्यांची संख्या कमी करणार आहे आणि 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल. नितीन गडकरी म्हणाले की, 60 किमीच्या परिघात येणारे इतर टोलनाके येत्या 3 महिन्यांत बंद केले जातील.केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांना टोल भरावा लागणार नाही. त्यांना पास दिला जाईल. यामुळं महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला दिलासा तर मिळेलच; पण अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त होतील वास्तविक, महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचं उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांची नेहमीच मागणी असते की, त्यांना टोलमध्ये सवलत द्यावी. कारण, स्थानिक असल्यानं त्यांना सतत प्रवास करावा लागतो.
No comments:
Post a Comment