नुकत्याच झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्थांचे उपनिबंधक तथा अध्यासी अधिकारी व्ही. आर. थत्ते होते.ंसंस्थेचे संस्थापक चेअरमन माजी सरपंच स्व. गोविंदराव चव्हाण यांच्या
निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर प्रा. अशोक चव्हाण यांची निवड झाली आहे. प्रा. चव्हाण कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असून कराडच्या महिला महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. श्री कालिकादेवी सहकारी पतसंस्था, शिवाजी क्रीडा मंडळ, भैरवनाथ क्रीडा मंडळ, सातारा जिल्हा हौशी
कबड्डी असोसिएशन अशा विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.
या निवडीनंतर अभिनंदन करताना ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, गोविंदराव
चव्हाण यांनी भाग्यलक्ष्मी सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या स्थापनेपासून सलग 36 वर्षे चेअरमनपद भूषविले. 1986 साली स्थापन झालेली संस्था 1991 साली सुरु झाली. व ज्येष्ठ नेते स्व. पी. डी.पाटीलसाहेब यांच्या
मार्गदर्शनाखाली सन 2002 मध्ये कर्जमुक्त झाली. पुढे म्हणाले, 1,460 एकर कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील 1,260 एकर शेतीला या संस्थेचे पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे. पैकी 785 एकर शेतीला पाणी पुरवठा संस्था सुयोग्य पद्धतीने करते. आज सर्व पाणी पुरवठा संस्थांच्या पुढे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे वीजबिल हा काळजी करणारा मुद्दा आहे. शासन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते. प्रा. चव्हाणयांच्या नेतृत्वाखाली ही पाणी पुरवठा संस्था लवकरच स्वावलंबी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.^यावेळी सह्याद्रि साखर कारखान्याचे संपर्क अधिकारी आर. जी. तांबे, इरिगेशन इंजिनिअर संजय क्षीरसागर,संस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग माने, संचालक विठ्ठलराव जाधव, आनंदराव देसाई, शिवाजीराव जाधव, रामचंद्र जाधव, बबनराव बाबर, वसंतराव बाबर, जगन्नाथ खडंग, सचिव आनंदराव जाधव उपस्थित होते.
--
No comments:
Post a Comment