Monday, March 28, 2022

गोरेगाव फिल्म सिटीला ड्रग्स सप्लाय करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात ; फिल्म इंडस्ट्रीत कोणाला ड्रग्सचा सप्लाय होतो याचा तपास सुरू...

वेध माझा ऑनलाइन - मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी 4 ऑटो रिक्षा ड्रायव्हरला ड्रग्ससह अटक केली आहे. ते रिक्षा चालवण्याच्या आड ड्रग्सची तस्करी करीत होते. ही गँग घाटकोपर भागातून ड्रग्स घेऊन गोरेगाव फिल्म सिटीमध्ये सप्लाय करीत होती. पोलिसांनी घटनास्थळाहून गांजा जप्त केला आहे आणि एक ऑटो रिक्षा जप्त केली आहे. या प्रकरणात चार आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणात तपास सुरू आहे.

दिंडोशी डिव्हीडनचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटीलची टीम गस्त घालत होती. यादरम्यान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्वामी नारायण मंदिर मालाड पूर्वेजवळ निर्जंन ठिकाणी काही संशयास्पद रिक्षा दिसल्या. पोलीस जेव्हा टीम घेऊन रिक्षाची चौकशी करायला पुढे गेले तर चालक रिक्षा घेऊन पळू लागले. यानंतर पोलिसांच्या टीमने रिक्षाचा पाठलाग गेला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तर रिक्षात गांजा सापडला. पोलिसांनी सर्व 4 आरोपी आणि रिक्षा जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात मो. हुसैन कुरैशी (38)अब्दुल रज्जाक मो. रफीक शेख(31)सलीम आजम शेख( 24)मो.अली निजामुद्दीन खान(24) यांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्वजण घाटकोपर भागात राहणारे आहेत. पोलिसांनी ड्रग पेडलर्सनाही कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडीत पाठवलं आहे. याशिवाय फिल्म सिटीमध्ये कोणाला ड्रग्स सप्लाय केला जातो, याचाही शोध सुरू आहे.

No comments:

Post a Comment