वेध माझा ऑनलाईन। संजय चव्हाण त्यांनी आपले कराड या कराडमधील सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून प्रशासनाला कराडच्या सुरू होणाऱ्या 24 तास पाणी प्रश्नी व पाणीबिला संदर्भात दर कमी करण्याबाबत व जुन्या पद्धतीने या बिलाची दर आकारणी करण्यासाठीचे पत्र दिले होते याप्रश्नी त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता दरम्यान जुन्या दराने कराडच्या पाणीपट्टी बिलाची आकारणी होणार हे आता निश्चित झाले आहे तसे आदेश साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत त्यामुळे आजच्या प्रशासनाच्या निर्णयाला आपले कराड ग्रुप ने घेतलेला फॉलोअप देखील महत्वाचा ठरला आहे
काही महिन्यांपूर्वी कराडचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला होता 24 तास पाणी शहराला देणार या चर्चेने अनेक वर्षे रखडलेली शहराची 24 तास पाणीपुरवठा स्कीम सपशेल फेल गेली असताना देखील दुसरीकडे त्याच्या नावाखाली बसवलेल्या फौल्टी मीटर बाबत गावातून तक्रारी येऊन हा विषय चिघळला होता... शहराला 24 तास पाणी मिळायचं राहीलं बाजूला पण त्या मीटर मधून येणाऱ्या हवेमुळे भरमसाठ बिल येतंय अशा तक्रारी गावात वाढल्या होत्या...तर काही ठिकाणी 9 -9महिने बिलच आले नाही अशी या पाणीपट्टी बिलाची बोंब उठली होती... आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने शहरातील पाणी पेटल्याची स्थिती गावात निर्माण झाली होती
दरम्यान, आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कराडच्या पाणी प्रश्नावर पूर्वीच्याच पद्धतीने पाणीपट्टी आकारणी करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत
शहरातील अनेक राजकीय नेत्यांसह काही सामाजिक कार्यकर्तेही या प्रश्नी पुढे झाले होते आपले कराड या सामाजिक ग्रुपने देखील घेतलेला यासाठीचा फॉलोअप देखील महत्वपूर्ण ठरला आहे या ग्रुपच्या माध्यमातून कराड शहराच्या या पाणीप्रश्नी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता