वेध माझा ऑनलाइन । शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीने उग्र रूप धारण केले होते. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळन लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. कोल्हापुरातील घटनेबाबत विरोधी पक्षनते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात दंगील घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कोल्हापुरातील परिस्थितीवर अजित पवार यांनी बोलताना, राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत आहेत असे सांगत कायदा हातात घेऊ नका, शांततेनं प्रश्न सोडवा असं आवाहन त्यांनी केलं.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून द्वेष निर्माण केला जातोय का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, हिंसाचार टाळण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. बंदची हाक दिल्यामुळे शांततेसाठी बैठक घ्यायला हवी होती. कोल्हापुरातील घटनेमागे कोण आहे याचा सरकारने छडा लावावा. तसेच पोलिसांना फ्री हँड द्यायला हवा असेही अजित पवारांनी म्हटले.
No comments:
Post a Comment