Saturday, June 3, 2023

कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश

वेध माझा ऑनलाइन। कराड येथील कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मधील दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये अनुक्रमे सर्वज्ञ सचिन गायकवाड-  ९४.२० % ,  ओमकार अनिल मोरे ९२.८० % ,  आदित्य सर्जेराव पाटील ८७.४० % असे गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले आहे.
        
तसेच इयत्ता बारावी मध्ये अथर्व शरणाथे  ८२.३३ % , सौदा  वाईकर ७८.८३ % पंकज माने ७८.०० % असे गुण मिळवून यांनीही बोर्डच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे. दहावीचे अंकिता पाटील ,अयाज मंगलगिरी ,रिहान मंगलगिरी यांनी मराठी माध्यमातून इयत्ता नववीपर्यंत शिक्षण घेतले होते. कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये त्यांनी इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी माध्यमातून हे घवघवीत यश संपादन केलेले आहे . या सर्वच विद्यार्थ्यांच्या यशासंदर्भात संस्थेचे संस्थापक डॉ. महेश खुस्पे, सौ.मंजिरी खुस्पे , कु. मैथिली खुस्पे,  प्राचार्या सौ. जयश्री पवार सर्व शिक्षक स्टाफ  व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment