कराड नगरपरिषदेचा केंद्र सरकारकडून विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कराड पालिकेचे अभियंता रफिक भालदार यांनी दिली आहे
पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये कराड पालिका अव्वल आल्याने केंद्र सरकारने कराड पालिकेचा विशेष सन्मान करण्याचे ठरवले आहे तसेच हागणदारीमुक्त कॅटेगरी मधील "वॉटर प्लस" हे सर्वोच्च मानांकन मिळवल्याचे देखील हे फलित आहे
5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विज्ञान भवन दिल्ली येथे हा सन्मान सोहळा पार पडणार आहे
कराड नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य अभियंता श्री.रफिक भालदार व जलनिस्सारण अभियंता श्री. अशोक पवार हे दिल्लीत जाऊन हा सन्मान स्वीकारणार आहेत अशी माहिती अभियंता श्री भालदार यांनी दिली आहे
या होणाऱ्या विशेष सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने कराड पालिका प्रशासनाचे कराडकरांकडुन विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे
No comments:
Post a Comment