Thursday, July 6, 2023

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार ?

वेध माझा ऑनलाईन। मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय वर्तुळातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यातून राज्यात आणखी नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे

दरम्यान, माझं वैयक्तिक काम होतं म्हणून मी भेटलो. युतीचा प्रस्ताव घेऊन यायला मी एवढ्या मोठ्या पदावर नाही. मी राज ठाकरे यांचा कट्टर सैनिक आहे. या सर्व विषयांवर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच उत्तर देतील. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो आहे. त्याचं टू प्लस टू फोर करू नका, असं अभिजीत पानसे म्हणाले.

No comments:

Post a Comment