Wednesday, July 5, 2023

कराड शहर व तालुक्याला नुतन प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणूका ;

वेध माझा ऑनलाईन। सातारा जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत कराड शहर व तालुक्याला नुतन प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणूका झाल्या आहेत

गेल्या बरेच महिन्यापासून कराड शहर व तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची नुसतीच चर्चा होती मात्र नुकतीच या ठिकाणी नूतन प्रभारी पोलिस् अधिकारी लवकरच हजर होणार आहेत

कराड शहरासाठी शहर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप बाळासाहेब सूर्यवंशी
 हे हजर होतील तर कराड तालुका पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक विजय तुकाराम पाटील हे अधिकारी म्हणून दाखल होणार आहेत कराडचे सध्याचे शहर पोलीस निरीक्षक बी आर पाटील हे लवकरच कोल्हापूर येथे रुजू होणार आहेत

No comments:

Post a Comment