वेध माझा ऑनलाईन। कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर ठाकरेंच्या शिवसेनेत उद्या (शुक्रवारी) प्रवेश करणार आहेत याबाबत त्यांनी स्वतः वेध माझाला याबाबत माहिती दिली त्यामुळे इंद्रजित गुजर ठाकरे गटात प्रवेश कधी करणार याबाबतच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे व यातूनच कराडच्या राजकारणाचा नवीन अध्याय सुरू होणार हे देखील आता नक्क्की झाले आहे
दरम्यान इंद्रजित गुजर हे उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा खूप दिवसापासून आहे मात्र त्यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर ते काही दिवसानी पक्षप्रवेश करतील असे ऐकिवात होते त्यांच्या कन्येचा विवाह नुकताच काही दिवसांपूर्वी सम्पन्न झाला आहे या विवाह सोहळ्यासाठी स्वतः संजय राऊत व ठाकरे कुटुंबीयांनी इंद्रजीत गुजर यांच्या कन्येला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आशीर्वाद दिल्याचे सर्व उपस्थित जनसमुदायाने पाहिले दरम्यान कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर ठाकरेंच्या शिवसेनेत उद्या (शुक्रवारी) प्रवेश करणार आहेत याबाबत त्यांनी स्वतः वेध माझाला याबाबत माहिती दिली आहे
नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने यांनी आपला स्वतंत्र गट निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे अप्पा माने हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते त्यांना विश्वासात घेतले नाही आणि अचानक पदावरून हटवण्यात आले अशी भावना अप्पा मानेंसह बाबा गटातील अनेकांची झाली व त्यातून नाराजी पसरत ठाकरे गटाची एन्ट्री कराडात होणार असल्याची देखील चर्चा आहे
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली होती त्यापूर्वी सेना नेते विनायक राऊत हे देखील इंद्रजित गुजर याना भेटले असल्याची बातमी मिळाली होती ठाकरे शिवसेनेतून त्यांना मोठ्या पदाची ऑफर दिल्याचेही वृत्त आहे
दरम्यान उद्या इंद्रजित गुजर हे मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश करतील त्यानंतर कराडात मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचे सहकारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे गुजर यांनी सांगितले दरम्यान असे असले तरी आगामी नगरपालिका निवडणुकीत बाबा गटासाहित होणाऱ्या महाआघाडीचे सदस्य म्हणून हेच नगरसेवक ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा बाबा गटाबरोबर हातात हात घालून एकत्र येत भाजप- शिंदे गटाशी दोन हात करण्यासाठी शहरात पुन्हा एकत्र दिसतील हेही आता यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे त्यामुळे गुजर यांच्या प्रवेशाने कराडचे राजकारण कोणते नाट्यमय वळण घेणार? हेच आता पहायचे आहे
No comments:
Post a Comment