Thursday, August 31, 2023

गॅस सिलेंडर 157 रुपयांची झाला स्वस्त ! ;

वेध माझा ऑनलाईन। आज मोदी सरकारने जनतेला दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट दिले आहे. २ दिवसांपूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडर वर २०० रुपयांची आणि उज्वला योजनेअंतर्गत ४०० रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. आता सरकार कडून कमर्शियल गॅसच्या किमतीत सुद्धा तब्बल १५७ रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या किमती अपडेट केलया आहेत. यावेळी सरकार कडून गॅसच्या किमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सुद्धा 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे सलग २ महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्यामुळे हॉटेल चालकांसाठी मोठा दिलासा आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ऑगस्टमध्ये 1680 रुपये होते, आता तुम्हाला यासाठी 1522.50 रुपये मोजावे लागतील.

पूर्वीप्रमाणे सहकार्य करा ; शेखर चरेगावकर यांचे लोकांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन। बँकेचे थकबाकीदार कर्जदार संजीव कुलकर्णी, विनोद कदम, उध्दव पासलकर व संदिप घळसासी यांनी त्यांचे यशवंत बँकेकडील थकीत कर्जाचे कारवाईबद्दल सुडबुध्दीने माझ्यावरती काही आरोप केलेले आहेत. वास्तवीक पाहता माझा वाई अर्बन बँकेच्या व्यवहाराचा आणि यशवंत बँकेचा काहीही संबंध नाही. शिवाय वाई अर्बन बँकेमधील कर्ज प्रकरणामध्ये असलेल्या तारण मालमत्ता अद्यापपर्यंत आम्हांला ताब्यात मिळालेली नाही. या विषयाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, याबाबतची अपुरी माहीती लोकांपुढे मांडून माझी व पर्यायाने यशवंत बँकेची बदनामी या थकबाकीदार कर्जदारांनी केलेली असून अजुनही करत आहेत. तरी चुकीच्या बातम्यांना बळी पडणाऱ्या ठेवीदारांना आपण मागताक्षणीच पैसे देत आहोत, ही देखील जमेची बाब आहे  सर्व तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये यशवंत बँकेचा उल्लेख केलेने बँक त्यांचे विरुध्द आब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करणार आल्याची माहिती दि यशवंत को- आॅप बॅंकचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.दरम्यान माझ्या अध्यक्ष पदाबाबत असलेल्या प्रोपोगंडा बाबत मी न्यायालयामध्ये दाद मागीतलेली आहे तरी यशवंत बॅंकेचे कामकाज आपण अधिक जोमाने करणार असून लोकांनी पूर्वीप्रमाणे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, या सर्व थकबाकीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई केल्याने यामधील काही जणांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. तर काही लिलावामध्ये काढलेल्या आहेत. यामधील तक्रारदार विनोद कदम यांना अजामीनपात्र वॉरंट निघालेले आहे. हे तकारदार बँकेच्या हितासाठी तक्रारी केलेल्या आहेत, असे म्हणत आहेत. जे मुलतः स्वतः थकबाकीदार आहेत. तसेच ते पैसे भरत नाहीत ते तक्रारदार आपल्या बँकेचे हित कसे काय जोपासणार? याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

माझ्या अध्यक्ष पदाबाबत असलेल्या प्रोपोगंडा बाबत मी न्यायालयामध्ये दाद मागीतलेली आहे. तरीदेखील अशा चुकीच्या बातम्यांना बळी पडणाऱ्या ठेवीदारांना आपण मागताक्षणीच पैसे देत आहोत, ही देखील जमेची बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यावी ही विनंती. आजपर्यंत आपले सहकार्य व विश्वासावर बँकेची यशस्वी वाटचाल आपण करु शकलो आहोत. यापुढे देखील आपल्या विश्वासाने, सहकार्याने अधिक चांगल्या पध्दतीने, अधिक जोमाने कामकाज करु असा विश्वास आहे. आपले सर्वांचे पुर्वीप्रमाणे सहकार्य लाभावे.


Wednesday, August 30, 2023

औरंगाबाद, उस्मानाबाद हीच नावे कायम राहणार ; न्यायालयाने याचिका काढली निकाली ;

वेध माझा ऑनलाईन। औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा निर्णय राज्यातील सरकारने घेतला होता. त्यानंतर केंद्राने देखील त्याला मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्हा व  उस्मानाबाद जिल्ह्याचेही मूळ नाव कायम राहणार आहे.

दोन्ही जिल्ह्यांच्या व महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नसल्याचे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान याचिका निकाली काढली
आता दोन्ही शहरांच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अनुक्रमे चार व पाच ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे.  त्यामुळे आता हा निर्णय काय होतो... याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आई-वडिलांना जी मुलं सांभाळणार नाहित त्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले मिळणार नाहीत : मसुर ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव; राज्यभरातूंन ठरावाचे कौतुक ;


वेध माझा ऑनलाईन। आई-वडिलांना जी मुलं सांभाळणार नाहित त्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले न देण्याबाबतचा ठराव कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीने नुकताच घेतला आहे. तसेच प्रत्येकाने नावामध्ये स्वतःचे नाव त्यानंतर आईचे, वडिलांचे व आडनाव असे क्रमशः लावायचे आहे अशा धोरणात्मक निर्णयाचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंकज दीक्षित होते. दरम्यान असा ठराव घेणारी ही राज्यातील कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असावी त्यामुळे या ठरावाचे राज्यभरातून विशेष कौतुक होताना दिसतंय
दरम्यान राज्यभरातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी हा ठराव करण्याची गरज असून भविष्यात याबाबतीत कायदा होण्याची देखील गरज असल्याचे सरपंच पंकज दीक्षित यांनी वेध-माझा शी बोलताना सांगितले...

माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, माजी उपसरपंच संजय शिरतोडे, सदस्य रमेश जाधव, सुनील जगदाळे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे,संग्रामसिंह जगदाळे, प्रमोद चव्हाण जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य संघटक दिलीप पाटील, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्रा. कादर पिरजादे, ऍड. रणजितसिंह जगदाळे, वैद्यकीय अधिकारी मैथिली मिरजे, वीज वितरणचे नलवडे , जलयुक्तचे अभियंता आदिनाथ शिरसाठ, तसेच आशा वर्कर्स अंगणवाडी ,शिक्षण व आरोग्य विभाग ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं तब्बल 13 वर्षांनी एकत्रित रक्षाबंधन ;

वेध माझा ऑनलाईन। राखी पौर्णिमेला मुंडे घराण्यातील बहिण-भावाची चर्चा सुरु असतेच. राजकारणात एकमेकांचे विरोधक असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आले.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आज रक्षाबंधन सण साजरा केला. 2009 नंतर प्रथमच मुंडे कुटुंबियांचे एकत्रित रक्षाबंधन पार पडले.

2009 नंतर म्हणजे 13 वर्षांनी मुंडे कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमेचा सण साजरा केला.पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रक्षाबंधनाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.राखी पौर्णिमेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली.मुंडे कुटुंबियांच्या रक्षाबंधनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे
धनंजय मुंडे यांना तिन्ही बहिणींनी राखी बांधली.पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी राखी बांधून घेतली.राजकीय विरोधामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दुरावले होते. यंदा मात्र एकत्रित येत रक्षाबंधन सण साजरा केला.



राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? अजितदादांना किती आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले अजित पवार...?

वेध माझा ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांमधील विरोध मावळला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय चाललंय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दुसरीकडे, अजित पवार हे शरद पवारांना भेटायला गेले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस फुटलीच नाही, असा दावा सुप्रिया सुळेंनी केला होता.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चित्र काय आहे? मुळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे की नाही? यावर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. राजकीय जीवनात वैचारिक भूमिका घेत असताना तुमच्यात मतमतांतरे असू शकतात. पण कुटुंब म्हणून तुमची वेगळी भूमिका असते. ही महाराष्ट्राची वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती आहे, असं उत्तर अजित पवारांनी दिलं. ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “आता तुम्हाला जसं दिसतंय, त्यापद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सुरू आहे. प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणी काय मत व्यक्त करावं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकीय जीवनात काम करताना तुम्ही वैचारिक भूमिका मांडू शकता. तुमच्यात मतमतांतरे असू शकतात. तुमची वेगवेगळी भूमिका असू शकते. पण कुटुंब म्हणून आपली भूमिका वेगळी असते. ही आपली वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके दोन गट आहेत की एकाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत? यावर अजित पवार पुढे म्हणाले, “हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तिथे आम्ही आमची भूमिका मांडली आहे. येत्या काळात निवडणूक आयोग त्यासंदर्भात आपला निर्णय घेईल. आम्ही सगळ्यांनी बहुमताचा आदर करून जी भूमिका घेतली, ती भूमिका योग्य आहे, असं माझं मत आहे.” तुमच्याकडे सध्या किती आमदार आहेत? यावर अजित पवारांनी सांगितलं, “जेवढे आमदार बरोबर असणं गरजेचं आहे. तेवढे आमदार माझ्याबरोबर आहेत.”

अजित पवारांचा भ्रष्ट्राचार उघड करा ; नरेंद्र मोदींना शरद पवारांचे थेट आव्हान ;

वेध माझा ऑनलाईन। अजित पवार काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ‘शरद पवार व अजित पवार हे आतून एकच आहेत’. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. आमच्यात कसलीही एकजूट नाही. आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला जनता जागा दाखवून देईल, असे स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, जलसंपदा घोटाळा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशीही नरेंद्र मोदी सरकारने करावी, असे थेट आव्हान सुद्धा शरद पवार यांनी यावेळी दिले. शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु जलसंपदा व शिखर बँकेचा उल्लेख करून त्यांनी थेट अजित पवारांवरच तोफ डागली.

विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या ‘इंडिया’ची बैठक ग्रँट हयात हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. इंडियातील घटक पक्ष एकत्र येवून पुढील निवडणुका लढवणार आहोत. पहिल्या दोन बैठका एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. निवडणुका कशा लढायच्या, जागा वाटप कसे करायचे याबाबत मुंबईतील या बैठकीत चर्चा होऊ शकते, असेही शरद पवार म्हणाले.

सत्तेत सामील होण्याआधी शरद पवारांनी काय सल्ला दिला होता? अजित पवार काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात थेट भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्षफुटीनंतर केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत विधान केलं होतं. त्यांनी आशीर्वाद देण्याचं काम करावं, असंही अजित पवार म्हणाले होते. यानंतर आता सत्तेत सामील होण्याआधी शरद पवारांनी काय सल्ला दिला होता? यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

पक्षफुटीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “पाठिमागच्या काळात देशात अनेक वेळा अनेक गोष्टी घडल्या आहे. काँग्रेसमध्येही फूट पडली होती. बऱ्याच ठिकाणी बरंच काही घडलं आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की, आता असं काही घडू नये, आता काहींनी (शरद पवार) आशीर्वाद देण्याचं काम करावं. आम्ही तर आवाहन केलंय की, आम्ही कुठे चुकलो तर वडिलकीच्या नात्याने त्यांनी सल्ला द्यावा. आम्ही असं म्हणत नाही की, आम्ही काम करतो म्हणजे आम्ही सर्वगुणसंपन्न आहोत. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचा गाडा हाकत असताना काही चुकीचं घडतंय, असं कुठल्या वडिलधाऱ्यांना वाटलं तर त्यांनी सांगावं. आम्ही लगेच चूक दुरुस्त करू. आम्हालाही राज्याचं आणि जनतेचं हित साधायचं आहे.” एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी बोललात, तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सल्ला दिला? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, “सगळ्यांशी जे बोलायचं होतं, ते बोललो आहे. पण काहीजण स्वत:चा हट्ट सोडायला तयार नसतील, तर शेवटी आम्ही तरी किती काळ थांबायचं? काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नसते. प्रत्येकाला ती महत्त्वाची वाटत असते. आम्हीही ३०-३५ वर्षे राजकारणात काम केलं आहे. त्यामुळे आम्हालाही खूप काही गोष्टी करून दाखवायच्या आहेत. आमची तशी इच्छा आणि आवड आहे.”

अजित पवारांना धक्का? साखर कारखान्यांबाबतचा शासन निर्णय अखेर मागे...

वेध माझा ऑनलाईन।  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच धक्का दिल्याचं बोललं जात आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साखर कारखान्यांबाबत काढलेल्या शासननिर्णय आठच दिवसांत मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ आणि शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलासा मिळत आहे. 

नवीन शासन निर्णय काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखानदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता भाजपच्या दबावामुळे अजित दादांचा हा निर्णय आठ दिवसातच मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. 

राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) मंजूर केलेले 549.54 कोटी रुपयांचे कर्ज हवे असेल तर कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचं हमीपत्र द्यावं आणि कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा, तसेच गहाणखत आणि अन्य दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्याच्या नव्या अटी लादण्यात आल्या होत्या. याचा फटका भाजप नेत्यांच्या कारखान्यांना बसणार होता. अखेर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळानं रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात अडचणीत असलेल्या सहा सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर 549.54 कोटी रुपयांचे खेळत्या भांडवलावरील कर्ज (मार्जिन मनी लोन) राष्ट्रीय सहकार विकास निगमनं (एनसीडीसी) काही दिवसांपूर्वी मंजूर केलं आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना 113.42 कोटी (माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील), पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना 150 कोटी आणि निरा-भीमा सहकारी साखर कारखाना 75 कोटी (दोन्ही कारखाने माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित), लातूर जिल्ह्यातील किल्लारी औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना 50 कोटी (भाजप आमदार अभिमन्यू पवार), जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना 34.74 कोटी (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित), सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना 126.38 कोटी (भाजप खासदार मुन्ना महाडिक) या कारखान्यांचा समावेश आहे. कर्ज मंजूर करताना एनसीडीसी तसेच राज्य सरकारनं 3 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घातलेल्या अनेक जाचक अटींची पूर्तता करताना कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या तोंडाला फेस आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कारखान्यांवर आणखी काही अटी घालण्याचा निर्णय झाला होता.


छत्रपतींचा आदर्श घेऊन कार्य करा ; लायन भावना शाह यांचा संदेश ; लायन्स क्लब ऑफ कराड मेन या नूतन क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण ;

  वेध माझा ऑनलाईन। - आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासाचे कर्ज आपल्याला फेडायचे आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे उत्तुंग कार्य आयुष्यात केले पाहिजे त्यांच्या नीतिमूल्यांना जपत लायन्स क्लबचे काम करा असा संदेश मुंबईहून आलेल्या लायन भावना शाह यांनी समस्त कराडच्या लायन परिवाराला दिला

यावेळी लायन्स क्लब ऑफ कराड मेनच्या अध्यक्ष पदाची शपथ खंडू इंगळे यांना देण्यात आली तसेच सचिवपदी संदीप पवार
खजिनदारपदी जयंत पालकर यांचेसह संचालक मंडळानीही शपथ घेतली.

यावेळी उद्घाटक डिस्ट्रिक्ट 3234 D 1 चे प्रांतपाल ला.भोजराज नाईक निंबाळकर,नविन सदस्य शपथविधी अधिकारी ला. धैर्यशील भोसले, रिजन चेअरमन बाळासाहेब शिरकांडे,झोन चेअरमन बाळासाहेब महामुलकर, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ॲडमिनिस्ट्रेटर मंगेश दोषी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजीव नाईक निंबाळकर,  लायन्स क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या  अध्यक्षा डॉ.भाग्यश्री शिंदे, लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसीच्या ला. वृषाली गायकवाड ,माजी प्रांतपाल ला. पांडुरंग शिंदे, माजी प्रांतपाल प्रभाकर आंबेकर, माजी प्रांतपाल सुनील सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराड येथील पंकज हॉटेल येथे पार पडलेल्या या सोहळ्यास सातारा सांगलीसह अनेक भागातून लायन सदस्य उपस्थित होते तसेच कराड रोटरी क्लब, व इनर्व्हील चे सदस्य देखील या सोहळ्यास उपस्थित होते

भावना शाह यांनी लायन सदस्यांना शपथ देताना छत्रपती शिवाजी महाराजांची नितीमुल्ये विषद करत छत्रपतींजवळ असणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि गोष्टींचा त्यांच्या कार्याशी कसा संबंध होता हे सांगत लायन च्या नुतन पदाधिकाऱ्यांना आगळ्या- वेगळ्या पद्धतीने शपथ दिली व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा असा संदेशही दिला

यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना नूतन अध्यक्ष खंडू इंगळे म्हणाले ज्या प्रमाणे शाह मॅडमनी छत्रपतींच्या नितुमूल्याप्रमाणे कराड मेन  लायन्स क्लबकडून कार्याची अपेक्षा केली आहे त्या पद्धतीने काम करण्याचा नक्कीच आम्ही सगळे प्रयत्न करू. समाजोपयोगी अनेक नवनवीन उपक्रम मोठ्या पद्धतीने राबवण्यात आम्ही लायन्सच्या माध्यमातून कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
यावेळी डिस्ट्रिक्ट स्केस्ट चेअरमन सुहास निकम,  कॅबिनेट ऑफिसर प्रा.बी.एस सावंत,ला.मनोज देशमुख,ला.गौरी चव्हाण,ला. विद्या मोरे,झोन चेअरमन रविकिरण गायकवाड,ला.ॲड.विजय जमदग्नी,रिजन सेक्रेटरी अनिल कदम,झोन चेअरमन अमितराज शेटे, लायन्स क्लब ऑफ कराड नक्षच्या अध्यक्षा ला.डॉ.अनघा राजगुरू,लायन्स क्लब ऑफ सातारा अजिंक्य चे अध्यक्ष रामदास कदम, लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाळचे अध्यक्ष अग्नेश शिंदे, मसूर क्लबचे रमेश जाधव, सदाशिव रामुगडे, डॉ.लोखंडे व रिजनमधील बहुसंख्य क्लबचे सदस्य उपस्थित होते.
सुत्रसंचलन ला.सचिन पाटील,ला.सुधीर पाटील,ला.शिवाजीराव फडतरे यांनी तर आभार ला. वैशाली निकम यांनी मानले.
या दिमाखदार सोहळ्यात आलिशान बैठक व्यवस्थेसह सुरमयी संगीत मैफिलीचे देखील आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या भोजन व्यवस्थेसह प्रत्येकाचा सन्मान यावेळी समारंभपूर्वक करण्यात आला

Tuesday, August 29, 2023

आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर शिंदे गट आणि भाजपची टीका ; ,काय केली टीका...?

वेध माझा ऑनलाईन। कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी कराड उत्तरचे आमदार हे उपरे असून त्यांचा या मतदारसंघाशी कसलाही संबंध नाही अशा या बिनकामाच्या आमदारांना मतदारसंघातून हद्दपार करण्याचे आवाहन केले
यावेळी भाजपा कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, जिल्हाप्रमुख शिवसेना जयवंतराव शेलार, वासुदेव काका माने,संपतराव माने,भीमराव पाटील,संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

शरद कणसे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये विकासाची गंगा वाहत असून सातारा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून मला प्रत्येक गावामध्ये विकास काम सुचवून त्यासाठी निधी दिला जात आहे त्यासाठी मी गावोगावी फिरत आहे. कराड उत्तरच्या कोणत्याही गावांमध्ये केलं तरी लोक ह्या आमदारांनी काहीच केलं नाही आणि त्यांच मतदान या मतदारसंघांमध्ये येत नाही त्यामुळे त्यांना इथल्या जनतेशी काही देणं घेणं नाही असे बोलत असतात केवळ साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरून आजपर्यंत यांनी कराड उत्तरचे नेतृत्व केलं परंतु त्यांचे हे वागण कराड उत्तर च्या जनतेला समजलं असून त्यांचे या मतदारसंघांमध्ये मतदान नाही किंवा ज्यांनी या मतदारसंघांमध्ये कसलाही विकास केला नाही अशा या बिनकामाच्या आमदाराला कराड उत्तर मधून हद्दपार करण्याचे आवाहन शरद कणसे यांनी केले.

मनोज घोरपडे म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी सुद्धा आज कराड उत्तर मधील अनेक गावांना रस्ता, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. या विभागांमध्ये गेली पंधरा वर्षे आमदार असताना  साधा रस्ता सुद्धा करता आला नाही परंतु शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून नहरवडी येथील जाधव वस्ती सारख्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा रस्ता तयार होऊन लोकांना ऊस वाहतूक व दळवळणाच्या सुविधा मिळतील.

वासुदेव माने म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,यांच्या माध्यमातून व जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने रहिमतपूर नगरपालिका हद्दीमध्ये व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून मला त्याबद्दल अभिमान वाटतो. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होणार असून आज रहमतपूर परतवडी, नहरवाडी, अशा ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. थोड्याच दिवसांमध्ये मुख्यमंत्री उमुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्ह्यातील प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेणार आहे.

यावेळी भीमराव काका पाटील संपत दादा माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निलेश माने विरोधी पक्ष नेते शंकर वीर  उपजिल्हाप्रमुख, तुषार निकम तालुका प्रमुख, शिवाजी निकम तालुकाप्रमुख ,सुरेश भोसले बदलापूर शहर प्रमुख, तुषार चव्हाण, सुखदेव माने आप्पा माजी नगराध्यक्ष,धनंजय पवार माजी नगरसेवक, मधुकर सावंत माजी नगरसेवक, रघुनाथ नाना ढाणे माजी नगरसेवक, प्रवीण माने माजी नगरसेवक, राजू रोकडे माजी नगरसेवक, विकास माळी माजी नगरसेवक, अंकुश भोसले माजी नगरसेवक, बाळासाहेब गोरे माजी नगरसेवक, दिलीप संकपाळ माजी नगरसेवक,राजेंद्र बाबुराव माने माजी नगरसेवक, विक्रम सिंह सोसायटी चेअरमन, अशोक माने चेअरमन, शेखर माने पाटील, बबलू शेख मुस्लिम नेते, नाशिक शेख, रणजीत माने, विक्रम माने माजी चेअरमन, पवन निकम,राजू नलवडे,सोमनाथ निकम, सतीश भोसले,महिपती यादव,आदी मान्यवरांचे उपस्थित संपन्न झाला

सर्वात मोठी बातमी ; चांद्रयान मोहिमेला मोठं यश; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ॲल्युमिनियमसह ऑक्सिजनही आढळले ;

वेध माझा ऑनलाइन। टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे.  दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण ध्रुवावर हायड्रोजनचा शोध रोव्हरकडून सुरू असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. 

विक्रम लँडरमधून वेगळे झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले. इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.  

चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारता हा पहिलाच देश आहे. 
भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ;

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला  अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पहिलं जातं. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक ही भाजपाकडून लढवली होती. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. 

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या. त्यानतंर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मोठी बातमी ; घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 200 रुपयांनी स्वस्त होणार ;

वेध माझा ऑनलाईन। महागाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 200 रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने याबाबत निर्णय घेत महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडूनअनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आता रक्षाबंधनच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना विशेष भेट दिली आहे. केंद्र सरकारकडून घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे देशभरातील महिला वर्ग चांगलाच खुश असणार आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1100 ते 1200 रुपये एवढा आहे. मात्र आता या किमतीमध्ये 200 रुपयांनी घट होणार आहे. ज्याचा मोठा फायदा नागरिकांना होईल.


काही मंडळी निवडणुका जवळ आल्या की विकासकामे आपणच केल्याच्या अविर्भावात भाषणबाजी करतात ; आ बाळासाहेब पाटील यांची विरोधकांवर टीका ; कण्हेरखेड (ता.कोरेगाव)येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन ;

वेध माझा ऑनलाईन। मतदार संघामध्ये विविध विकास कामे सुचवण्याचा व त्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचा तसेच निधी उपलब्ध करून घेण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सहकार्याने मला मिळाला आहे, त्या माध्यमातून मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व गावे, वाड्या, वस्त्यांना समान न्यायाने निधीचे वाटप केले असून, विकासाचा झंजावात सुरू आहे. मात्र निवडणुका जवळ आल्या की काही मंडळी झालेली विकास कामे आम्हीच केली या अविर्भावामध्ये भाषणबाजी करतात व श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून सावध रहा असे आवाहन आमदार बाळासाहेब यांनी केले.

 कण्हेरखेड ता.कोरेगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार स्थानिक विकास निधी सन 2022-23 मधून मंजूर झालेल्या बौद्ध वस्ती मधील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, आमदार स्थानिक विकास निधी सन 2021-22 मधून मंजूर होऊन पूर्ण झालेल्या श्री गणेश मंदिरासमोरील सभागृहाचे उद्घाटन, 'क' वर्ग पर्यटन निधी सन 2022- 23 मधून स्वर्गीय माधवराव शिंदे सभागृहाचे नूतनीकरण करणे या कामाचे भूमिपूजन, 2515 इतर जिल्हा ग्रामीण विकास निधीतून काळुबाई मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर 2020 मधून मंजूर झालेल्या कन्हेरखेड-एकंबे रस्त्याचे व त्या रस्त्यावरील पुलांचे उद्घाटन, 5054 इतर जिल्हा मार्ग विकास निधी सन 2021 मधून मंजूर झालेल्या जायगाव- कन्हेरखेड- वेलंग दुघी - कठापूर इजिमा 82 रस्ता सुधारणा करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, काकासो गायकवाड, भरत कदम, अमोल कदम, शंकर शिंदे, प्रशांत संकपाळ, विजय कदम, समाधान कदम, प्रशांत कदम, अलम डफेदार, समाधान गायकवाड, शेखर पाटणे, विठ्ठल काकडे, शिवाजी महागडे, एकनाथ जेधे, शंकर सणस,  धोम पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश धुमाळ, साखरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चव्हाण, सरपंच संजय शिंदे(सरकार), ॲड. दीपक शिंदे, चेअरमन संभाजी शिंदे, व्हा. चेअरमन वाघमारे सर, दुष्यंत शिंदे, केशव शिंदे, हणमंत साळुंखे, विश्वास शिंदे, समीर शिंदे, हणमंत पवा,र तानाजी बुधावले, धनाजी भोसले, अंकुश भोसले, रविंद्र पवार, दत्तात्रय पवार, प्रवीण साळुंखे, महेंद्र शिंदे, दीपक अंकुश शिंदे, संतोष साळुंखे, विश्वास शिंदे, संग्राम शिंदे, कुणाल शिंदे, प्रणव शिंदे, सुभाष शिंदे, अमर शिंदे, मंथन साळुंखे, सौ.अर्चना शिंदे, सौ.नलिनी पवार, सौ रुपाली साळुंखे, सौ.वर्षा शिंदे, सौ.कांचन शिंदे तसेच ,ग्रामस्थ उपस्थित होते.

सीबीआयकडून 'ईडी'च्या अधिकाऱ्याला ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अटक :

वेध माझा ऑनलाईन।  दिल्ली दारू धोरण प्रकरणात सीबीआयने 'ईडी'च्या एका अधिकाऱ्याला ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. 'ईडी'मध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करणार्‍या पवन खत्री यांनी या प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.  तपासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तक्रारीनुसार, अमनदीप सिंग धल आणि बिरेंद्र पाल सिंग यांनी दारू पॉलिसी प्रकरणात चालू असलेल्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान प्रवीण वत्स यांना ५ कोटी रुपये दिले होते.

दीपक सांगवान यांनी काही पैशांच्या बदल्यात अमनदीप सिंग धल्ल यांना अटकेपासून वाचवण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिले होते. प्रवीण वत्स यांनी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत अमनदीप धल्ल यांच्याकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या सहा हप्त्यांमध्ये यांच्याकडून ३ कोटी रुपये घेतले असे प्रवीण वत्स यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यानंतर दोन कोटी रुपये दिल्यास तुमचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले जाईल, असे आश्वासन त्यांनी धल्ल यांना दिले. अमनदीप धल्ल यांनी सांगवान यांची ही मागणीही पूर्ण केली. मात्र, सांगवान यांनी आश्वासन दिल्यानंतरही ईडीने अमनदीप धल्ल यांना १ मार्च २०२३ रोजी अटक केली. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संस्थेतील काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे पुरावे सापडले  झडती दरम्यान, प्रवीण वत्स यांच्या निवासस्थानी २.१९ कोटी रुपये रोख आणि १.९४ कोटी रुपये किमतीचे हिऱ्यांचे दागिने सापडले. याशिवाय त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये सापडले. 

मणिपूर मध्ये पुन्हा भडकली हिंसा ! ; 17 विद्यार्थिनींचे अपहरण ; रिकामी घरे पेटवली !

वेध माझा ऑनलाईन। हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अपहरणाची खळबळजनक घटना सोमवारी समोर आली. बिष्णुपूर जिल्ह्यातील कामोंग येथे अज्ञात समाजकंटकांनी १७ शाळकरी विद्यार्थिनींचे अपहरण केले. या मुली १२ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. पोलिस व सुरक्षा दलांनी त्यांच्या सुटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान मणीपुरात पुन्हा हिंसा भडकल्याचे चित्र निर्माण झाल आहे रिकाम्या घरांना पेटवण्याच्या प्रकार घडले आहेत

सुदैवाने तीन मुली ‘अपहरणकर्त्यांच्या’ तावडीतून निसटण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी कारमधून उडी मारली. शाळकरी मुलींच्या अपहरणासाठी अपहरणकर्त्यांनी दोन इको व्हॅनचा वापर केला. मुलींच्या अपहरणामागे खंडणी मागण्याचा हेतू असण्याची शक्यता आहे. ही घटना मणिपूरची राजधानी इंफाळपासून १५ किमी अंतरावर असलेल्या कामोंग येथील हाओखंबन हायस्कूलमध्ये घडली, असे पोलिसांनी सांगितले. 
दरम्यान, मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी मंगळवारपासून सुरू हाेणारे विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. राजधानी इंफाळच्या न्यू लॅम्बुलेन भागात रविवारी दुपारी हल्लेखोरांनी तीन रिकाम्या घरांना आग लावली. अन्य एका घटनेत अज्ञात व्यक्तींनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडील दोन एके-४७ रायफलसह तीन बंदुका पळविल्या.  
जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात जमलेल्या लोकांनी पोलिस दल व केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांकडे घटनास्थळी जाऊ देण्याची परवानगी मागू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या. 
दरम्यान मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी रविवारी सरकारला आदिवासींच्या भावना आणि राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन २९ ऑगस्टचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

Monday, August 28, 2023

आता भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

वेध माझा ऑनलाइन। जगातील ४० टक्के तांदूळ निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारताचा एक निर्णय अमेरिकेपासून अरब देशांपर्यंत खळबळ माजवणार आहे. भारताने बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली ते तर तुम्हाला माहीत आहे. तेव्हा बासमती तांदळाच्या निर्यातीला यातून सूट देण्यात आली होती. मात्र जगात पुन्हा एकदा संकट ओढावू शकते, यासाठी भारताने काही खास बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्‍या बिगर बासमती तांदळाची संभाव्य निर्यात रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी करून सविस्तर माहिती दिली.

‘या’ बासमती तांदळाची निर्यात होणार नाही
मंत्रालयाने रविवारी एक अधिसूचना जारी केली की, आता प्रति टन १२०० डॉलरपेक्षा कमी किमतीचा बासमती तांदूळ देशातून निर्यात केला जाणार नाही आणि मंत्रालयाकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. भविष्यात APEDA चे अध्यक्ष अशा निर्यात करारांच्या तपासणीसाठी एक समिती स्थापन करतील, जी या करारांचे मूल्यांकन केल्यानंतरच निर्यातीस परवानगी देईल.

शरद पवारांनी घेतला वळसे पाटलांचा खरपूस समाचार ; काय म्हणाले शरद पवार ?

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. शरद पवारांची कोल्हापूर येथे मोठी सभा झाली. यानंतर, काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

दिलीप वळसे-पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे व विश्वासू मानले जात होते. मात्र, अजित पवार गटासोबत जाताना त्यांनी शरद पवारांची उघडपणे साथ सोडल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात मोठे विधान केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्या विधानावरून घुमजावही केले. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी थेट दिलीप वळसे-पाटील यांनाच लक्ष्य केले. 

तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो
मी स्वबळावर मुख्यमंत्री झालो. तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आधी पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झालो. दुसऱ्या वेळा काँग्रेससह माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या. ती आम्ही जिंकली. बहुमत आले. मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करायचे, असा उलटप्रश्न शरद पवार यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

दरम्यान, शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिले नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत. शरद पवार हे उत्तुंग नेते असतानाही राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे ६० ते ७० आमदार निवडून येतात कुणाशीही तरी आघाडी करावी लागते, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले होते.

शेखर चरेगावकर यांची यशवंत बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी ;

वेध माझा ऑनलाईन। सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची यशवंत को ऑपरेटिक बँक लि. फलटण जि.सातारा या बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी केल्याने शैलेश कोतमिरे,अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर कारवाई केली आहे. 

चरेगांवकर हे आदेशाच्या दिनांकापासून समितीच्या पुढील पाच वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्वीकृत होण्यास, किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही असे आदेशात म्हटले आहे.

 काय आहे आदेश ?

यशवंत को ऑपरेटिक बँक लि. फलटण जि.सातारा या बँकेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्याखालील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 या मधील तरतूदीनुसार झालेली आहे. श्री.संजीव दत्तात्रय कुलकर्णी, समासद, दि यशवंत को-ऑप.बँक लि., फलटण यांनी त्यांचेकडील तक्रार अर्ज दिनांक 17/01/2023 अन्वये या कार्यालयाकडे तक्रार केली आहे की, शेखर सुरेश चरेगावकर हे सातारा जिल्ह्यातील यशवंत को. ऑप. बँक लि. फलटण या बँकेचे अध्यक्ष आहेत. 

चरेगावकर यांचेविरुद्ध दि वाई अर्बन को-ऑप. बँक लि. वाई यांनी कलम 101 अन्वये रुपये 5,45,09,973/- रकमेचे प्रमाणपत्र दिनांक 9/12/2022 रोजी प्राप्त केले आहे. तरी कलम 73 कअ मधील तरतुदीनुसार  चरेगावकर हे परतफेड कसुरदार/डिफॉल्टर ठरत असल्याने त्यांचे दि यशवंत को-ऑप.बँक लि. फलटण या सहकारी बँकेतील अध्यक्षपद निरस्त करण्यात यावे व अनुषंगिक योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती अर्जदार यांनी केली होती.

त्यानुसार दि वाई अर्बन को. ऑप. बँक लि. वाई या बँकेकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी, दि. वाई अर्बन को- ऑप. बँक लि., वाई यांनी त्यांचेकडील पत्र दिनांक 20/03/2023 अन्वये अहवाल या कार्यालयास सादर केला आहे. त्यानुसार चरेगांवकर हे दि वाई अर्बन को. ऑप. बँक लि., वाई या बँकेचे थकीत कर्जदार असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ (१) (व) मधील तरतुदी लागू होत असलेमुळे श्री. शेखर चरेगांवकर यांना उक्त बँकेचे संचालक पदावरून दूर का करण्यात येवु नये? याबाबत म्हणणे मांडण्याकरिता या कार्यालयाची कारणे दाखवा नोटिस दिनांक २१/०४/२०२३ ची सर्व संबंधीतांवर बजावणी करून सर्व संबंधीतांना वेळोवेळीच्या सुनावणीमध्ये म्हणणे मांडणे/ युक्तीवाद करणेची पुरेशी व वाजवी संधी देण्यात आली. दिनांक २/५/२०२३, २९/०५/२०२३, १९/०६/२०२३, ०३/०७/२०२३ व दिनांक २४/०७/२०२३ रोजी सुनावणीचे कामकाज करण्यात आले. 

उक्त दिनांकापैकी केवळ दिनांक २९/०५/२०२३ रोजी  शेखर चरेगावकर हे उपस्थित होते. सदर दिनांकास त्यांना संबंधीत कागदपत्रे मिळणे व म्हणणे मांडपोसाठी पुढील तारीख मिळावी, अशी विनंती केली. त्यानुसार या कार्यालयाकडील पत्र दिनांक ०५/०६/२०२३ अन्वये अँड. डी. बी. पाटील तर्फे  शेखर चरेगावकर यांना सदर प्रकरणाच्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती दिनांक ०५/०६/२०२३ रोजी समक्ष देण्यात आल्या आहेत. त्यानंतर वेळोवेळी दिनांक १९/६/२०२३, ०३/०७/२०२३ व २४/०७/२०२३ रोजी सुनावणीची पुरेशी संधी देण्यात आली. तथापि सदर दिनांकास ते गैरहजर होते. 

तसेच त्यांनी प्रत्येक सुनावणीचे वेळी पुढील तारीख मिळावी, अशी लेखी मागणी केली आहे. सुनावणीचे दिनांकास अथवा त्यानंतर केव्हाही त्यांनी सदर प्रकरणी त्यांचे कोणतेही मौखिक अथवा लेखी म्हणणे सादर केलेले नाही. या बाबत दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटण यांनी कोणतेही म्हणणे सादर केलेले नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ (१) मधील तरतुदीनुसार उक्त बँकेच्या संघीय संस्था असलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँकस फेडरेशन मुंबई यांना प्रस्तुत प्रकरणाबाबतची नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे सादर करण्यास कळविण्यात आले होते. त्यानुसार त्यांचेकडील पत्र दिनांक १७/०६/२०२३ चे पत्रा अन्वये कळविण्यात आले आहे की, सुनावणीचे वेळी अर्जदार व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून प्रस्तुत प्रकरणी कायदा व उपविधीतील तरतुदीनुसार यथोचित निर्णय घ्यावा.

सदर प्रकरणी तक्रारदार श्री. संजीव दत्तात्रय कुलकर्णी यांचे कडील अर्ज दिनांक २७/०२/२०२३ मुख्य कार्यकारी दि वाई अर्बन को-ऑप बँक लि., वाई जि.सातारा यांचेकडील दिनांक २०/०३/२०२३ रोजीचा अहवाल, सर्व संबंधीतांनी दाखल केलेले कागदपत्रे मांडलेले म्हणणे/ युक्तीवाद, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७३ कञ आणि ७८अ. यांतील तरतुदीचा विचार करता पुढिलप्रमाणे निरीक्षण व निष्कर्ष नोंदविण्यात येत आहेत.

निरीक्षण व निष्कर्ष जि. सातारा यांचेकडून अहवाल मागविण्यात आला होता. श्री. शेखर चरेगांवकर हे दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., फलटण जि.सातारा या बँकेचे अध्यक्ष आहेत. तक्रारदार श्री. संजीव दत्तात्रय कुलकर्णी यांनी त्यांचेकडील दिनांक १७/०१/२०२३ चे तक्रार अर्जान्वये श्री. शेखर चरेगांवकर हे दि वाई अर्बन को-ऑप बँक लि., वाई जि.सातारा या बँकेचे थकबाकीदार आहेत. असे या कार्यालयास कळविले आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून दिनांक ०९/०३/२०२३ चे पत्राने दि वाई अर्बन को-ऑप. बँक लि., वाई महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी, दि वार्ड अर्बन को-ऑप. बँक लि., वाई जि.सातारा यांचे पत्र दिनांक २०/०३/२०२३ अन्वये सदर प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला असून असे नमूद केले आहे की, दि बाई अर्बन को-ऑप. बँक लि. वाई या बँकेने श्री.शेखर सुरेश चरेगावकर व इतर सहकर्जदार यांना दिनांक १७/३/२०१८ रोजी १३.५% दराने १२० महिने मुदतीसाठी रुपये ६ कोटी इतके टर्म लोन मंजूर केले आहे. सदर कर्जासाठी रुपये ९.२८ कोटी मुल्यांकनाचे तारण घेतले आहे.

कर्जाचे वितरण दिनांक २१/३/२०१८ रोजी झाले असून आजअखेर येणेवाको रुपये ५.३०,१६,५२२/- इतकी असून थकबाकी रु.१,०५,८८,५६८/- (थकहप्ते १२) इतकी आहे. श्री. शेखर चरेगांवकर यांचे कर्ज खाते थकबाकी होऊन एनपीए मध्ये गेलेनंतर वसुलीसाठी बँकेने कलम १०१ अन्वये दिनांक ०९/१२/२०२२ रोजी रुपये ५,४५,०९,९७३/- रकमेचा वसुली दाखला प्राप्त केलेला आहे व कलम १५६ नुसार सदर खात्यावर पुढील कारवाई प्रक्रीया सुरू आहे.

खुलाशावरून श्री. शेखर चरेगांवकर हे दि याई अर्बन को-ऑप. बँक लि., बाई या बँकेचे वत कर्जदार असल्याचे सकृतदर्शनी दिसून आल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० से. कलम ७३कअ नुसार निरहंता ओढविली असल्याने व कलम ७८१) अन्वये या कार्यालयाकडून खर चरेगावकर यांना दिनांक २१/०४/२०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. vi. सदरची नोटीस सर्व संबंधीतांना R.P.A.D. पोस्टोनच e-mail अन्वये पाठविण्यात आली होती. vii. त्यानुसार वेळोवेळी झालेल्या सुनावणीमध्ये श्री. शेखर चरेगावकर यांनी सदर प्रकरणी त्यांच कोणतेही मौखिक अथवा लेखी म्हणणे मुदतीत सादर केलेले नाही. अथवा त्यांनी केव्हाही ते दि खाई अर्बन को- ऑप. बँक लि. वाई जि. सातारा या बँकेचे थकबाकीदार असल्याचे नाकारलेले नाही. याचा अर्थ से सदर बँकेचे थकबाकीदार असल्याचे नाकारलेले नाही. याचा अर्थ से सदर बँकेचे थकबाकीदार असल्याचे त्यांना मान्य आहे असा होतो.

दि वार्ड अर्बन को-ऑप. बँक लि. वाई जि. सातारा यांनी दिलेल्या अहवालानुसार श्री. शेखर चरेगावकर हे दि वाई अर्बन को-ऑप.जक लि. वाई या बँकेचे थकीत कर्जदार असून सदर बँकेने त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला प्राप्त केला आहे. श्री. शेखर चरेगावकर हे थकबाकीदार असल्याचे सिद्ध होत आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कञ(२) (एक) (ड) मधील तरतुदीनुसार बिगर कृषी पत संस्थेच्या बाबतीत देण्यात आलेल्या कर्जाचा कोणताही हाता फेडण्यास ज्याने कसूर केली असेल असा सदस्य, कसुरदार सदस्य ठरतात परिणामी उक्त अधिनियमाचे कलम ७३ क (१) मधील तरतुदीनुसार कोणत्याही संस्थेच्या समितीचा सदस्यपदी निवडून येण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास पात्र असणार नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कजर) (एक)(ड) मधील तरतूदीनुसार विगर कृषी पत संस्थेच्या बाबतीत देण्यात आलेल्या कर्जाचा कोणताही हप्ता फेडण्यास ज्याने कसूर केली असेल असा सदस्य, कसुरदार सदस्य ठरतात परिणामी उक्त अधिनियमाचे कलम ७३ क (१) मधील तरतुदीनुसार कोणत्याही संस्थेच्या समितीचा सदस्यपदी निवडून येण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास पात्र असणार नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८२(१) मधील तरतुदीनुसार समितीस निष्प्रभावित करण्याचा किया तिच्या सदस्यांना काढून टाकणे बाबत तरतूद आहे. त्यानुसार समितीचा सदस्य म्हणून राहण्यास निरह झाला असेल तेथे ७८(२) मध्ये तरतुद केल्याप्रमाणे लेखी निवेदन करण्याची वाजवी संधी दिल्यानंतर आणि त्याबाबत म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर व ती संस्था जिच्याशी संलग्न असेल त्या संघीय संस्थेशी विचारविनिमय केल्यानंतर नोटीशीव्दारे नमूद केलेले दोषारोप सिध्द झाले आहेत या निष्कर्षाप्रत आला असेल तर, त्याबाबतची कारणे नमूद करून आदेशाव्दारे सदस्याला काढून टाकू शकेल.

उपरोक्त परिच्छेदांवरुन कारणे दाखवा नोटिस दिनांक २१/०४/२०२३ मधे नमूद केले नुसार दि यशवंत को ऑप. बँक लि., फलटण जि. सातारा या बँकेचे अध्यक्ष श्री. शेखर चरेगांवकर हे दि खाई अर्बन को. ऑप. बँक लि. वाई जि.सातारा या बँकेचे थकबाकीदार असलेबाबतचा दोषारोप सिध्द होत आहे. 3. उपरोक्त परिच्छेदावरुन श्री. शेखर चरेगावकर हे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६२ चे कलम ७३ क.अ. ((२) मधील तरतुदीनुसार निरहंता ओढवली असल्याने त्यांना दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लि.. फलटण जि.सातारा या बँकेच्या संचालक पदावरून दूर करणे आवश्यक झाले आहे. अशी माझी खात्री झाली आहे. खालील प्रमाणे आदेश देत आहे.

आदेश - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मो. शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आदेश देतो की. श्री. शेखर चरेगांवकर यांना या आदेशाच्या दिनांकापासून दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लि. फलटण जि.सातारा या बँकेच्या संचालक पदावरुन दूर केले आहे.

तसेच उक्त अधिनियमाचे कलम ७३(३) अन्वये श्री. शेखर चरेगांवकर हे या आदेशाच्या दिनांकापसून समितीच्या पुढील पाच वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्वीकृत होण्यास, किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही. सदर आदेश आज दिनांक ०२/०८/२०२३ रोजी माझे सही शिक्केनिशी व कार्यालयौन मुद्रनिशी दिला आहे.

Sunday, August 27, 2023

चांद्रयान ३ च्या यशात कराड तालुक्यातील काले गावच्या प्रवीण कुंभारचा मोठा वाटा ;

वेध माझा ऑनलाईन।  भारताने चांद्रयान 3 मोहीम फत्ते करून नवा इतिहास रचला चांद्रयान ३ च्या या यशात कराड तालुक्यातील काले येथील प्रवीण कुंभार यांचाही मोठा हातभार आहे. प्रवीण कुंभार हे सध्या इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथे मायक्रोवेव्ह पेलोड मेकॅनिकल विभागात कार्यरत आहे.

 प्रवीण भीमराव कुंभारने 2014 साली द्वितीय क्रमांकाने’ उत्तीर्ण होऊन “मशीन डिझायनर-B” म्हणून त्याची निवड झाली होती. प्रवीणने चांद्रयान ३ च्या का-बँड अल्टिमीटरच्या सेन्सर प्रणालीच्या यांत्रिक रेखाचित्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे चांद्रयान मोहिमेत काले गावच्या प्रवीणचा महत्वाचा वाटा  आहे.

इस्रोमध्ये काम करत असताना अनेक दिग्गज शास्त्रज्ञांना भेटण्याची आणि त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान ३ विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे यशस्वी लँडिंग हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर, त्याठिकाणी काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी आनंद साजरा केला आणि एकमेकांना मिठी मारली अशी प्रतिक्रिया प्रवीण कुंभार यांनी दिली. 

चांद्रयान तीन या यशस्वी मोहिमेनंतर आणखी अंतराळ मोहीम इस्रो राबवणार ; आता मानवाला पाठवणार अंतराळात ; इस्रो च्या शास्त्रज्ञांची माहिती;

वेध माझा ऑनलाईन। चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यासोबतच आणखीन काही अंतराळ मोहीम इस्रो कडून राबवण्यात येणार आहेत. इस्रो कडून बऱ्याच वर्षांपासून मानव युक्त मोहिमेची पूर्वतयारी सुरू आहे. आता ही पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली असून 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या पहिल्या तिमाही मध्ये ही मोहीम राबवण्यात येईल.पीटीआय सोबत बोलत असताना इस्रोचे शास्त्रज्ञ एन रघु सिंग यांनी ही माहिती दिली. 

त्यापैकी एक मोहीम ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा सोबत करण्यात येणार आहे. यासोबतच इस्रोच्या गगनयान अंतर्गत तीन मोहिमांसोबतच बाकीच्या सहा मोहिमा राबवण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला दोन मिशनमध्ये अंतराळवीर नसतील. तिसऱ्या मोहिमेमध्ये मात्र तीन अंतराळवीर असणार आहेत. मार्च 2024 पूर्वी ही मोहीम संपन्न केली जाईल असं सांगण्यात येत आहे.

या मानवयुक्त मोहिमेमध्ये तीन दिवसांसाठी या तिन्ही अंतराळवीरांना तळातील अंतराळात पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर हे तिन्ही अंतराळवीर पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवरून सलग तीन दिवस गगनयान प्रदक्षिणा घालतील. त्यानंतर कृ मॉडेल यानापासून वेगळे करून पृथ्वीवर उतरवण्यात येतील. परंतु जेव्हा पहिल्या दोन मिशन यशस्वी होतील तेव्हाच या मानवयुक्त मोहिमा करता येऊ शकतात.

आतापर्यंत रशिया अमेरिका, चीन या तीन देशांना अंतराळात मानव युक्त मिशन राबवण्यासाठी यश मिळाले आहे. गगनयानाच्या मानव युक्त मोहिमेनंतर भारताचा देखील या यादीमध्ये समावेश होईल. यासोबतच भारत पुढच्या वर्षी चंद्रयान मोहीम ल्यूपेक्स लॉन्च करणार आहे. हा भारत आणि जपान चा संयुक्त उपक्रम असून पाण्याचे विश्लेषण हे या मिशनचे उद्दिष्ट असेल. त्याचबरोबर इस्रो सूर्य मंगळसूत्र या ग्रहावर देखील संशोधन करण्याची तयारी करत आहे.


बायकोने एवढे किस घेतले नाहीत, तेवढे किस आज घेतले गेले ; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी ; सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत एन्ट्री ; लोकांकडून अभूतपूर्व स्वागत ;

वेध माझा ऑनलाईन। शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच शनिवारी आपल्या बारामती मतदारसंघात दाखल झाले. यावेळी बारामतीकरांनी अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करत अभूतपूर्व स्वागत केलं. या स्वागतानंतर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजी केली यावेळी लोकांकडून स्वागत होताना काहीजण हात धरून किस घ्यायचे… बायकोने एवढे किस घेतले नाहीत, तेवढे किस आज घेण्यात आले असे अजित पवारांनी म्हणताच त्याठिकाणी जोरदार हशा पिकला 

“ज्या पद्धतीने बारामतीत स्वागत करण्यात आलं, असं कधी मी बघितलं नव्हतं. एवढे माझे वर्गमित्र भेटले की, मी पाहतच राहिलो. माता-भगिनी ओवाळत होत्या. तरूण मुलं-मुली प्रोत्साहन आणि शुभेच्छा देत होते. सगळी बारामतीबाहेर आली होती. अशा प्रकारची मिरवणूक आयुष्यात पाहिली नव्हती,” असं अजित पवार म्हणाले.

“हे एक प्रेम आहे. मी कोणालाही बळजबरी केली नव्हती. लोकांचा उत्साह, प्रेम, आपुलकी मिळत होती. काय तो फुलांचा आणि पाकळ्यांचा पाऊस पडला होता. अशा फुलांच्या पाकळ्या बारामतीतील रस्त्यांनी पाहिल्या नव्हत्या. एवढं ढकला-ढकली आणि रेटा-रेटी आयुष्यात कोणी मला केली नाही,” अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.

 ठरवलं होतं चिडायचं नाही”
“हातात-हात दिल्यावर लोक ओढायचे… हात ओढले की वाटायचं, हा हात तुटून पडतोय की तो तुटतोय, असं झालं होतं. काही-काही हात धरून किस घ्यायचे… बायकोने एवढे किस घेतले नाहीत, तेवढे किस घेण्यात आले. आरं काय चाललं आहे? पण, आज ठरवलं होतं चिडायचं नाही… सगळ्यांना फक्त नमस्कार करायचा,” असं अजित पवार म्हणाले आणि एकच हशा पिकला.

“एवढ्या प्रकारच्या टोप्या मला घातल्या गेल्या. एक घातली की दुसरी… नंतर तिसरी… आता मला विचार करावा लागेल, किती वाजता कामाला सुरुवात करायची आणि कितीवाजता झोपायचं,” असं अजित पवारांनी म्हटलं.
“तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत १ लाख ६८ हजारांचं मताधिक्य दिलं. समोरच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केलं. असं केल्यानंतर मी काय करायचं? त्यामुळे मी पहाटे ५ वाजताच बावचळून उठतोय. कामाला लागतोय. बायको म्हणते दमानं, दमानं घ्या. हे चाललंय काय? जरा वयाचा विचार करा. पण, वय वगैरे काही नसतं. कामामधून वेगळंच समाधान मिळतं,” असं अजित पवारांनी सांगितलं.

 

छगन भुजबळांनी पवारांच पाहिलं सगळंच काढल... ; शरद पवारांवर भुजबळांची चौफेर टीका ; पवारांवर अक्षरशः बरसले ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे आहे आणि अध्यक्ष कोण हे आजची सभा पाहिली तर लक्षात येईल. पक्षाचे अध्यक्ष  हे अजित पवार असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. शरद पवार  यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात, दुसरी धनंजय मुंडे, तिसरी हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात झाली. पण ज्यावेळी बारामतीचा विषय आला त्यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत. अजित पवार नेते आहेत म्हणता तर मग उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि भांडण मिटवून टाका असेही छगन भुजबळ म्हणाले. 

जयंत पाटील आणि शरद पवार यांना सांगितलं होतं की, पश्चिमीकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळवा आणि नशिकमार्गे पाणी मराठवाड्याला आणा असे छगन भुजबळ म्हणाले. हे होऊ शकतं, मी स्वतः मांजरपाडा धरणाचा प्रयोग केला. एक बोगदा पाडला आणि पाणी आणलं. मी शरद पवार यांना सांगितलं परंतू त्यांनी अजिबात ऐकलं नाही असे छगन भुजबळ म्हणाले. 

पवार साहेब सर्वांची माफी मागणार का?
साहेब तुमच्याबरोबर जे लोक भाषणं करत आहेत, त्यांना विचारा भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी 54 जणांनी सह्या केल्या. आता जे भाषणं करत आहेत त्यांना विचारा सह्या केल्या की नाही असे छगन भुजबळ म्हणाले. तुम्ही अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीला जायला सांगितलं. त्यांना वाटाघाटी करायला सांगितले. त्यावेळी मी आणि धनंजय मुंडे नव्हतो असे छगन भुजबळ म्हणाले. माझ्या मतदार संघात आलात त्यावेळी तुम्ही म्हणालात की माफी मागतो की मी भुजबळांना इथून उभं केलं. आता गोंदिया पासून कोल्हापूर पर्यंत 54 ठिकाणी सर्वांची माफी मागणार का? असा सवाल देखील भुजबळांनी केला. 

अजितदादांनी पहाटे शपथविधी केला त्यावेळी तुम्ही म्हणाला गुगली होती. राजकारणात अशी गुगली असते का? असा सवाल भुजबळांनी केला. ज्यावेळी माझ्यावर ईडीची कारवाई झाली. प्रॉपर्टी जप्त झाली. माझ्यासकट समीर भुजबळ जेलमध्ये गेला. पण मी घाबरलो नाही. आम्ही तुमच्यासोबत कायम राहिल्याचे भुजबळ म्हणाले. काँग्रेस फुटली त्यावेळी मी शरद पवार यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे नेते मला मुख्यमंत्री करतो असे म्हणाले होते. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यासोबत जाऊ नका. परंतु मी शरद पवार यांच्यासोबत राहील्याचे छगन भुजबळ म्हणाले. 
23 डिसेबंर 2003 ला मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी मी गृहमंत्री होतो. तेलगीला मी अटक केली. काही लोकांनी माझ्यावर आरोप केले. तेव्हा तुम्ही मला राजीनामा देण्यास सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. मी तेलगीवर कारवाई केली. तेव्हा झी चॅनलवर दगड पडले, त्यावेळी तुम्ही म्हणालात गोयल यांचा फोन आला आहे. तुम्ही राजीनामा द्या. मुळात ते म्हणाले होते की, भुजबळ यांचा दोष नाही, तरी तुम्ही माझा राजीनामा का घेतला असा सवाल भुजबळांनी केला.

पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटीचा निधी मंजूर ; पालकमंत्री देसाई यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन । पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयातून प्रसिध्दीपत्रकांद्वारे ही महिती दिली आहे.

जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये... बेलदरे 45.15 लाख, म्होप्रे 177.41 लाख, गिरेवाडी 82.04 लाख, आडदेव बु व आडदेव खुर्द 188.65 लाख, साबळेवाडी 86.37 लाख,वाडीकोतावडे 53.83 लाख,खळे 98.77 लाख,नवसरवाडी 89.91 लाख, नाडोली 80.48 लाख, माजगाव 115.14 लाख, वेताळवाडी 120.75 लाख व त्रिपुडी  87.13 लाख या योजनांचा समावेश आहे
 
या मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांना केल्या आहेत अशी माहिती प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत देण्यात आली आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक ; सातारा सायबर सेलकडं तक्रार दाखल ;

वेध माझा ऑनलाईन। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी केली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील ऍडमिनचा अ‍ॅक्सेस काढून घेतल्याचे निदर्शनास आलं त्यानंतर सदरचं पेज हॅक केल्याचं स्पष्ट झालं दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचे समजताच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयानं सातारा सायबर सेलकडं तक्रार दाखल केलीय. फेसबुक पेज हॅक झालं असल्याने कोणतीही अनाधिकृत पोस्ट पडल्यास त्याला हॅकर जबाबदार असेल, असे आमदार शिवेंद्रराजेंच्या जनसंपर्क कार्यालयानं म्हटलं आहे. कोणतीही पोस्ट पडल्यास कार्यकर्ते, शिवेंद्रराजे फॅन्स आणि नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असं आवाहनही जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. 

Saturday, August 26, 2023

अखेर ठरलं! ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार ? अशोक गेहलोत यांनी सांगूनच टाकलं ...

वेध माझा ऑनलाईन। देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपा नेतृत्वाखालील एनडीएकडून २०२४ मध्येही पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच असतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. पण ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असतील? याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी दिली. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांनी चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असंही गेहलोत म्हणाले. ‘इंडिया टुडे’शी बोलताना गेहलोत यांनी ही माहिती दिली.

पवार पुन्हा झळकले अजितदादांच्या फ्लेक्सवर ;अजितदादांचा पुन्हा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख ; काय चाललंय काका- पुतण्याचं ? राज्यात पुन्हा चर्चा...

वेध माझा ऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याची त्यांच्या समर्थकांना भलतीच घाई झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राज्याच्या विविध भागात यापुर्वीही अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर झळकले आहेत. आता धाराशिव जिल्ह्यात पुन्हा असे बॅनर लागल्यामुळे... विशेष म्हणजे याच बॅनरवर शरद पवार यांचा फोटो देखील आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत काका पुतण्याच नेमकं काय चाललंय ? अशा चर्चा यानिमित्ताने होत आहेत.

माझा फोटो परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शरद पवारांनी संभाजीनगर, बीड दौऱ्यावर असतांना दिला होता. तर दुसरीकडे अजित पवार आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट पडलीच नाही अशी विधान काल अनुक्रमे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली होती.त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललय काय?या चर्चना आता उत आलेला दिसतो आहे 
दरम्यान धाराशिवमध्ये अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या बॅनरवर शरद पवारही झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
संघटनात्मक बांधणीसाठी धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या हस्ते अजित पवार गटाच्या धाराशिवमधील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. याच्या तयारीसाठी लावलेल्या बॅनरवर अजित पवारांना भावी मुख्यमंत्री करण्यात आले आहे. ते देखील शरद पवारांच्या साक्षीने याचीही चर्चा होत आहे

पीण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडले ; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाईन। पाऊस नसल्याने  कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडत चालले आहे. सांगली, कुपवाड शहरासाठी आठ दिवस उपसा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सांगली महापालिकेने केलेल्या विनंतीनुसार कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट बनल्याने कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेकडून पाटबंधारे विभागाला करण्यात आल्यानंतर शनिवारी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील एक युनिट कार्यान्वित करून १०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.दरम्यान कृष्णा नदीचे पात्र पडले कोरडे पडत चालले असल्याची  सध्यस्थिती आहे  सांगली, कुपवाड शहराला आठवडाभर पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेने पाटबंधारे विभागाला केली होती.त्यानुसार पाणी सोडण्यात आले दरम्यान सध्या कोयना धरणात ८५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे  

अहमदनगरमध्ये शरद पवार-अजित पवार गटात नामफलकाचा वाद ; वाद पोहोचला पोलिस ठाण्यात ;

वेध माझा ऑनलाईन। एकीकडे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही असं वारंवार सांगितलं जात असताना स्थानिक पातळीवर मात्र राष्ट्रवादीचे दोन गट अनेक ठिकाणी दिसून येत आहे आणि आता या दोन्ही गटांमध्ये वाद देखील व्हायला सुरुवात झाली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये लावलेल्या नामफलकावरून आता शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर स्वतंत्र पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी भवनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या लावलेल्या फलकावरून वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद थेट कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचला आहे.

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या स्वतंत्र पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. त्यावर लावलेल्या नामफलकावरून वादाची ठिणगी पडली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्या दालनावरील नामफलक हटवून शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा नामफलक लावण्यात आला आहे. त्यावरून ही वादाची ठिणगी पडली आहे. 

माणिक विधाते यांच्या फिर्यादीवरून नावाचा फलक हटवल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. नामफलकाची तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार भाजप- शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. शरद पवार गटाकडून नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर प्राध्यापक माणिक विधाते हे अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान अहमदनगरचे राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे आहे त्यामुळे शरद पवार यांच्या अधिपत्याखाली हे राष्ट्रवादी भवन येत असल्याने तेथील शहर जिल्हाध्यक्ष यांच्या दालनावरती आपण स्वतःचा नाम फलक लावला असल्याचं शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच आम्ही कोणतीही तोडफोड केली नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तोडफोड केल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, लोक जितेंद्र आव्हाडांना कोल्हापुरी पायताणाने हाणतील ;

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरमधील सभेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर ‘मी नाय त्यातली.. म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या लपवलेल्या गोष्टी बाहेर आल्यावर लोक त्यांना  कोल्हापुरी पायताणाने हाणतील,’ अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. त्यांनी शरद पवारांवार काय जादू केली, माहीत नाही. मात्र, ठाण्यातील पक्ष संपविण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी अजित पवार, आमच्याबद्दल असं बोलू नये. आम्ही सत्तेत येण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यावर 53 आमदारांच्या सह्या होत्या. त्यात जितेंद्र आव्हाड यांचीही स्वाक्षरी होती. आव्हाडांनी कोल्हापुरी पायतानाची भाषा वापरल्यानंतर आम्हाला कापशीचं पायतान काढावं लागलं, ती बसल्यावर कळेल, अशी कडवट प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे.

काँग्रेस वाघाचा पक्ष आहे, कुत्र्या मांजराचा नाही ; नाना पटोले यांचे हटके स्टाईलने विधान ;

वेध माझा ऑनलाईन ।  केंद्रातील आणि राज्यातील सरकार तोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे तसंच शिवसेना-राष्ट्रवादीमधील बंडखोरांवर त्यांनी निशाणा साधला आहे काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारलं असता पटोले यांनी खास शैलीत उत्तर दिलं केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रातील सरकार हे राज्यातील सरकार तोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तर काँग्रेस पक्षातील कोणीही भाजपासोबत जाणार नसून, आमचा पक्ष कुत्र्या मांजरांचा नाही तर वाघाचा असल्याचा इशारा, नाना पटोले यांनी दिला 

दरम्यान येत्या ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, गावात जनसंवाद यात्रा सुरू होणार आहे. कोकणात सर्वजण मिळून दौरा करणार आहेत. तसंच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाणार आहे. लोकशाही धोक्यात आणली, व्यवस्थेला संपवण्याचं काम, शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचं काम सरकारनं केलं. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग केला. सत्तेच्या भरवशावर सगळं मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ईडीचे सरकार येऊन दीड वर्ष झालं. यावर आम्ही जनसंवाद यात्रेत बोलणार आहोत असं नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक शिंदे गट आणि काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, आमचा पक्ष कुत्रा-मांजरांचा नाही तर वाघाचा आहे.इतर पक्षात काँग्रेसकडून कोणीही जाणार नसल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. पेपरफुटी, विशिष्ट लोकांना नोकऱ्या, शेतकरी प्रश्न यावर ते का बोलत नाहीत असेही ते म्हणाले 

कराडात तब्बल 17 लाखाची चोरी ; जालिंदर रैनाक यांची पोलिसात तक्रार ;

वेध माझा ऑनलाईन।  तब्बल सतरा लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील वाखाण रोडलगत पी. डी. पाटील पार्क इमारतीत घटना घडली आहे  जालिंदर यशवंत रैनाक यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडात वाखाण रोडलगत पी. डी. पाटील पार्क इमारतीत जालिंदर रैनाक हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी पत्नीसाठी बारा तोळे वजनाचे मंगळसूत्र, बारा तोळे वजनाचे सोन्याचे तोडे, तेरा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या बनवल्या होत्या. त्याबरोबरच त्यांनी स्वत:साठी चार तोळे वजनाची सोन्याची चैनही बनवली होती. हे दागिने त्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. दि. 22 रोजी जालिंदर रैनाक यांनी कपाट उघडले असता कपाटातील दागिन्यांची पिशवी त्यांना दिसली नाही. दरम्यान, दि. 20 रोजी सकाळी अंगठी शोधण्यासाठी लोखंडी कपाट उघडून त्यातील दागिने असलेली पिशवी आपण बाहेर काढली होती, हे जालिंदर रैनाक यांना आठवले. तसेच पिशवी पुन्हा कपाटात न ठेवता ती खालीच ठेवून कपाट बंद केल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अज्ञाताने घरात घुसून सोन्याचे दागिने असलेली पिशवी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. जालिंदर रैनाक यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

अजितदादांबाबत भगतसिंग कोशारी यांचे विधान चर्चेत ; कोशारिंची "इंडिया टुडे' ला मुलाखत ; काय म्हणाले कोशारी ?

वेध माझा ऑनलाईन । महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द कायम वादळी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतसिंह कोश्यारी चर्चेत आले होते. आता भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असं मिश्किल विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,” असं कोश्यारी यांनी म्हटलं.

संघटनेत अजित पवारांची ताकद आहे”
“मला कधीकधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं,” असेही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

“शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत,” असं कौतुक भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवार यांचं केलं.

बापू निधी नको, पाणी द्या ; शेतकऱ्यांची शिंदे गटाच्या आमदाराला हाक ; शिंदे गटाच्या आमदाराला बक्कळ निधी मिळाला, पण पाणी मिळेना ;

वेध माझा ऑनलाईन ; काय डोंगार… काय झाडी… या डायलॉगमुळे राज्यात प्रसिध्दीस आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा तालुक्यात सततची दुष्काळी परिस्थिती त्यातच यंदा पावसाने दडी मारल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्ग आता चिंतेत आहे. बापूंनी आमदार झाल्यानंतर विकासकामांसाठी तालुक्यात तसा बक्कळ निधी नेला आहे. मात्र तालुक्याचा पाणीप्रश्न मात्र सुटलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील मतदार आता बापूंवर कमालीचा नाराज झाला आहे.

यंदा मोसमी पावसाने टांग दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. सांगोला तालुक्यात दुष्काळी चिन्हे दिसत असातना नीरा उजवा फाटा क्रमांक आठला मात्र अद्याप पाणी मिळालेले नाही. नियमाने ‘टेल टू हेड’ असे पाणी वाटप होणे अपेक्षित असताना देखील हे लाभक्षेत्र पाण्यापासून का वंचित आहे, असा सवाल शेतकरी करत आहेत.

एकीकडे बापूंनी सांगोला उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. परंतू पावसाअभावी आता खरिप हंगाम वाया गेल्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या ती पिके आता करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. निरा उजव्या कालव्याच्या फाट्याला पाणी सुटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अद्याप या कालव्याला पाणी न सुटल्याने ‘बापू निधी नको आता पाणी द्या’ अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

"जयवंत शुगर्स 'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ; नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटकडून घोषणा; जयवन्त शुगरची राष्ट्रीय पातळीवर दखल ;

वेध माझा ऑनलाईन।  भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ११ ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील कानपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयवंत शुगर्सने नेहमीच ऊसउत्पादक शेतकरी सभासदांचे हित जोपासले आहे. कारखाना व्यवस्थापनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राध्यान्य देत आणि साखर उद्योगातील बदलत्या स्थितीचा अभ्यास करत नेहमीच उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. जयवंत शुगर्सने अल्पावधीतच साखर उद्योगात भरारी घेत साखरेबरोबरच अन्य उपपदार्थांची निर्मिती करत, सातत्याने आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. साखर उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जयवंत शुगर्सने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांचे याबाबतचे पत्र नुकतेच कारखान्यास प्राप्त झाले आहे.

दि. ११ व १२ ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील कानपूर येथे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट व उत्तरप्रदेश शुगर मिल्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद व ‘साखर एक्स्पो’ आयोजित करण्यात आले असून, या परिषदेला विविध साखर उत्पादक देशांमधील ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे जयवंत शुगर्सच्या सर्वोकृष्ट कामगिरीवर राष्ट्रीय नाममुद्रा उमटली आहे. याबद्दल जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.