Wednesday, August 9, 2023

अखेर...साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजचे नाव काय ठरले ? आजच आला शासनाचा आदेश ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। कित्येक दिवसापासून सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या नामांतराची चर्चा केली जात होती सातारा मेडिकल कॉलेजचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाच्यावतीने आजच देण्यात आले आहेत.

सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय सुरु होत असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना यामध्ये मेडिकलचे शिक्षण घेता येणार आहे. मात्र, या प्रशस्त अशा शासकीय मेडिकल महाविद्यालयाच्या नामाधिकारनाच निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला नव्हता. अखेर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला राज्य शासनाच्या वतीने आज आदेश देण्यात आले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा” असे नामाधिकरण करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.याबाबतचे आदेश राज्य शासनाच्यावतीने आजच देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment