Friday, August 4, 2023

शासन आपल्या दारीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; रणजित पाटील मित्र परिवारातर्फे आयोजन; 1200 जणांना जागीच दाखले ;

वेध माझा ऑनलाईन। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱया शासन आपल्या दारी या उपक्रमास येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजितनाना पाटील व मित्र परिवार व शिवसेनेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 1200 नागरिक व महिलांना जागीच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
हा उपक्रम रणजितनाना पाटील मित्र परिवाराच्या अथक परिश्रमाने यशस्वी ठरला. जिल्हय़ाचे पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कराडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱयांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार रणजित पाटील व सहकाऱयांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात अनेक नागरिकांची अडलेली शासकीय कागदपत्रांची कामे या शिबिरात निकाली निघाली. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, रणजित पाटील यांच्या हस्ते वाखाण रोडवर आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, एकनाथ बागडी, राजेंद्र माने, गुलाबराव पाटील, प्रमोद शिंदे, मुकुंद चरेगावकर, स्वाती पिसाळ, शिवसेनेच्या विद्या शिंदे, माजी नगरसेवक सुहास जगताप, ऍड. दीपक थोरात, घनश्याम पेंढारकर आदींनी शिबिरास भेट दिली.
शिबिरात महसूल, बँका, पंचायत समिती, नगरपालिका महिला व बालकल्याण, नागरी आरोग्य केंद्र, आधार, रेशन कार्ड अद्ययावतीकरण, नवीन मतदार नेंदणी, उत्पन्न दाखला, रहिवास दाखला, सात बारा वाटप, राष्ट्रीयत्व दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, आर्थिक दुर्बल दाखला, नॉन क्रिमिलेअर, महावितरणशी संबंधित कामे, कृषी विभागाच्या योजना अशा विविध शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. परिसरात शिबिराविषयी जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे सकाळी नऊपासून शिबिरात लाभार्थींची गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे 2 हजार नागरिक, महिलांनी शिबिरास भेट दिली. यातील सुमारे 1200 नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व शासकीय दाखले देण्यात आले.  
अनेक नागरिकांनी या शिबिराच्या माध्यमातून अडलेली शासकीय कामे मार्गी लागल्याचे सांगत शासनास धन्यवाद दिले. तसेच रणजितनाना पाटील मित्रपरिवारासही धन्यवाद दिले. प्रतापराव इंगवले, सुहास गोतपागर, आदित्य इनामदार, सर्फराज बागवान, सुनील शिंदे, सुहास पाटील, दिलीप पाटील, महेश पाटील, सतीश पाटील, संतोष तेलकर, सतीश कदम,  विक्रांत पालकर, सचिन वास्के, सूरज शिंदे, अशोक शिंदे, बाबासाहेब बनसोडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment