वेध माझा ऑनलाईन। दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कराडच्या युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने कराड शहरातून येत्या 15 ऑगस्टला तिरंगा रैलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठांनचे संस्थापक अध्यक्ष विष्णू पाटस्कर यांनी दिली
देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वे वर्ष झाली आहेत त्यानिमित्ताने येत्या मंगळवारी दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता तिरंगा रॅली चे कराड शहरातून आयोजन करण्यात आले आहे... ही रॅली दत्त चौकातून निघून आझाद चौक मार्गे चावडी चौक येथे येईल त्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रगीत होईल तसेच तेथे स्वातंत्र्यवीरांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे तरी या रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन विष्णू पाटसकर यांनी केले आहे
युवा विकास प्रतिष्ठान च्या वतीने रोजगार मेळावा आरोग्य शिबीरे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तिरंगा रॅली चे देखील अनेक वर्षांपासून या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन केले जाते या रॅलीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात तसेच सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा याही क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात प्रत्येकाची देशप्रेमाची भावना प्रकट व्हावी या उद्देशाने या रॅलीचे आयोजन दरवर्षी केले जाते
No comments:
Post a Comment