Thursday, August 3, 2023

पक्षफुटीचा स्टंट करून जनतेला फसवू नका, शरद पवार हे नेहमीच दुतोंडी वागले आहेत. ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात ; .”प्रकाश आंबेडकरांकडून बोचरी टीका!

वेध माझा ऑनलाईन । अजित पवारांसह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर चार-पाच दिवस अजित पवार गट आणि शरद पवार गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. पण त्यानंतर दोन्ही गटातील नेते शांत झाले आहेत. विधानभवन परिसरात दोन्ही गटाचे नेते एकमेकांशी हसत-खेळत गप्पा मारताना किंवा गळाभेटी करताना दिसत आहेत. पक्षाच्या या स्थितीमुळे दोन्ही गटांच्या भूमिकेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी (१ ऑगस्ट) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या राजकीय घडामोडींनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीकास्र सोडलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी एक मीम शेअर करत शरद पवारांवर टीका केली आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले, “जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली होती. तुम्हाला (शरद पवार) जर द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याबरोबर (भाजपा) जायचं असेल, तर खुशाल जावा. पण तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला फसवू नका. शरद पवार हे नेहमीच दुतोंडी वागले आहेत. ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात.”

No comments:

Post a Comment