Thursday, March 31, 2022

सातारा जिल्ह्यात हेल्मेट सक्ती...!

वेध माझा ऑनलाइन  - आता प्रत्येक व्यक्तीने दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरलेे पाहिजे  सातारा जिल्हयातील शाळा, कॉलेज व  सरकारी कार्यालयातील सर्व संबंधितांनी व नागरिकाानी  दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरलेे पाहिजे हेल्मेट नसल्यास संबंधीत नागरिक मोटार वाहन अधिनियम, 1988 नुसार शिक्षेस पात्र राहतील.  असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिले 

लाल दिव्याची गाडी असूनही सायकल प्रवास करून स्वीकारला पदभार; कमिशनर दर्जाचे अधिकारी वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी घालून दिला आपला आदर्श...काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - लाल दिव्याची गाडी असतानाही तब्बल 250 किलोमीटरचा सायकल प्रवास करुन  सहाय्यक विभागीय कमिशनर दर्जाचे अधिकारी वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला... सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांनी कृतीतून  पर्यावरण संवर्धनाचा संदेशच यातून दििला आहे 

ऑफिसमध्ये बसून आणि कुठेतरी एखादे झाड लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे आपणास अनेक पाहायला मिळतील पण लाल दिव्याची गाडी असताना तब्बल 250 किलोमीटर सायकलने प्रवास करून कृतीतून पर्यावरणाचा संदेश देणारी माणसं दुर्मिळच... हो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक.. सहाय्यक विभागीय कमिशनर दर्जाचे अधिकारी वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला विशेष म्हणजे त्यांना सरकारी लाल दिव्याची गाडी आहे तरीही लडकत यांनी तब्बल 250 किलोमीटरचा पुणे ते कोल्हापूर असा सायकल प्रवास करून पदभार स्वीकारला निसर्गाचे संवर्धन करा पर्यावरणाचे रक्षण करा असा केवळ तोंडी संदेश देणारे खूपच पाहायला मिळतील पण लडकत यांनी 250 किलोमीटरचा सायकल प्रवास करत निसर्गाच्या संवर्धनाचा दिलेला हा अनोखा संदेश कौतुकाचा विषय ठरतोय 
कराड येथे त्यांचे स्वागत उपसंचालक उत्तम सावंत सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार बाळकृष्ण हसबनीस यांनी केले नानासाहेब लडकत यांनी मेळघाट व्याघ्रप्रकल्पात कामाची सुरुवात केली तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ते सहाय्यक वनसंरक्षक होते याबरोबरच जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअर उपसंचालक म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम पाहिला आहे ते पुणे येथे वनसंरक्षक कार्य व आयोजन येथे कार्यरत होते त्यांनी नुकताच कोल्हापूर येथे पदभार स्वीकारला मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे अजित पाटील तथा क्रिएटिव नेचर फ्रेंड चे नाना खामकर हेमंत केंद्रे यांनी त्यांचे सह्याद्रीमध्ये स्वागत केले
वेध माझा ऑनलाइन - कोरोना महासाथीचं थैमान अद्यापही संपलेलं नाही. पण तरी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कोरोना निर्बंधही हळूहळू शिथील करण्यात आले पण चेहऱ्यावरील मास्क काही हटला नाही. काही प्रमाणात सूट देण्यात आली तरी मास्क बंधनकारक होते त्यामुळे या मास्कपासून सुटका कधी मिळणार असंच सर्वांना वाटत होतं. अखेर तो दिवस आला. गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली आहे.

ज्याची प्रतीक्षा सर्वांना होती, ती बातमी नववर्षाच्या आधीच आली आहे. गुढीपाडव्याआधी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांची मास्कमुळे होणारी कोंडीही सोडवली आहे. नागरिकांना मास्क फ्री करून राज्य सरकारने नागरिकांना नववर्षाचं सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात यंदा गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकारने गुढीपाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. गुढी पाडव्याच्या मिरवणूक काढण्यात येणार आहेत. मुस्लीम बांधवांना रमजान उत्साहात साजरा करता येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे.

उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज! ; शरद पवारांसमोर बोलून दाखवली नाराजी...

वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडीमधील कुरबुरी कायम आहेत. एका बाजूला काँग्रेसचे २५ आमदार नाराज असताना आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर समाधानी नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेना अतिशय आक्रमकपणे अंगावर घेत असताना राष्ट्रवादीनं नरमाईची भूमिका घेतल्यानं शिवसेनेत नाराजी आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे बोलून दाखवल्याचं वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यावरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रवादीनं मात्र नरमाईची भूमिका घेतल्याचं शिवसेना नेत्यांना वाटतं. राष्ट्रवादीनं भाजपविरोधात कधी कधी 'सॉफ्ट' भूमिका घेतली, त्याची उदाहरणंच शिवसेनेतील सुत्रांनी दिली आहेत.

१३ मार्चला मुंबई पोलिसांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीतील मुंबई पोलिसांच्या सायबर विंगमध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्यानंतर गृह मंत्रालयानं अचानक निर्णय बदलला. पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या निवासस्थानी गेले. शिवसेना नेत्यांना ही बाब खटकली. गृह मंत्रालय ज्याप्रकारे पोलीस दल हाताळत आहे, त्याबद्दल शिवसेना समाधानी नाही. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे.
 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर तोफ डागू लागले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं विधान शिवसेनेला रुचलेलं नाही. 'दोन्ही बाजूंनी शांत व्हावं आणि परिस्थिती हाताबाहेर जायला देऊ नये,' असं पवार म्हणाले होते. शिवसेनेला अजित पवारांकडून आक्रमक पवित्रा अपेक्षित होता. मात्र तसं झालं नाही.

गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं. तालिका अध्यक्षांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यावर अजित पवारांनी घेतलेली भूमिका शिवसेनेला पटली नाही. आमदारांना काही तास किंवा दिवसांसाठी निलंबित केलं जाऊ शकतं. पण १२ महिन्यांचा कालावधी जास्त असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं.

 २८ मार्चला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. 'मोदींना लोकांनी कौल दिला आहे. त्यांच्यात काही तरी चांगले गुणे असावेत किंवा ते चांगली कामं करत असावेत. मात्र ती विरोधकांना शोधता येत नसावीत,' असं मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

'भाजपविरोधातील लढाई आम्हीच लढत आहोत. शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक फ्रंटफूटवर आहेत. पण राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीनं ज्याप्रकारे भाजपशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही,' असं शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यानं एक्स्प्रेसला सांगितलं.राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीशरद पवारांना सांगितलं आहे. मविआनं आक्रमकपणे भाजपचा सामना करावा असं खुद्द शरद पवारांचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील, अशी आशा सेना नेत्यानं व्यक्त केली.
 


राष्ट्रीय महामार्गावरील टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ ; आज रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार !

वेध माझा ऑनलाइन - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये  आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील  प्रवास महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गावरील टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ केली आहे. तर छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपयांनी वाढ, तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

उद्या 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्यासाठी लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्लीला जोडणाऱ्या बहुतांश महामार्गांवरील टोल टॅक्समध्ये किमान 10 टक्के वाढ झाली आहे. किमती वाढल्यानंतर आता कार मालकांना किमान 5 रुपये अधिक कर भरावा लागू शकतो. माहितीनुसार, उत्तर प्रदेश-हरियाणामध्ये येणाऱ्या कुंडली-मानेसर-पलवल महामार्गावर आता कारकडून 1.46 रुपयांऐवजी 1.61 रुपये प्रति किलोमीटर टोल लोकांकडून आकारला जाणार आहे.

नरेंद्र मोदी ठरले सर्वात शक्तिशाली भारतीय ; शरद पवार,उद्धव ठाकरे कितव्या स्थानावर आहेत ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊन आठ वर्षे पूर्ण होत आल्यानंतरही नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या भारतातील १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांनी अव्वलस्थान पटकावले आहे. तर या यादीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाहा हे दुसऱ्या स्थानावर आहेत. नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी सहावे स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत सोळावे आणि शरद पवार यांनी १७ वे स्थान पटकावले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना ८३ वे स्थान मिळाले आहे. 

इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या या यादीनुसार पंतप्रधान मोदी अव्वलस्थानी आहेत. कोरोनाचे संकट, कोरोनावरील लसीचे व्यवस्थापन, विधानसभा निवडणुकीतील भाजपाची दमदार कामगिरी यामुळे मोदींची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. या यादीवर नजर टाकल्यास अमित शाहा यांना दुसरे स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तिसऱ्या स्थानावार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना चौथे स्थान मिळाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे पाचव्या स्थानावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहाव्या स्थानावर आहेत. उद्योगपती गौतम अदानी हे सातव्या स्थानी आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवव्या आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन दहाव्या स्थानावर आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचा विचार केल्यास यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६ वे स्थान मिळाले आहे. तर शरद पवारांना १७ वे स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तिसऱ्या स्थानी आहेत. गेल्या काही काळात आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना ८३ वे स्थान देण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेच फडणवीसांचे स्थान २१ अंकांनी घसरले आहे. गतवर्षी ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत ६२ व्या स्थानी होते.

पहिल्या १० स्थानांनंतरच्या प्रमुख व्यक्तींचा विचार केल्यास त्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या अकराव्या स्थानी आहेत. तर सरन्यायाधीश रमण्णा हे १२ व्या स्थानी आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तेरावे स्थान मिळाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २७ वे, राहुल गांधी यांना ५१ वे आणि अखिलेश यादव यांना ५६ वे स्थान मिळाले आहे.



Wednesday, March 30, 2022

उदयनराजेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर शिवेंद्रराजेंनी काय दिले उत्तर? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे यांच्यात चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली. दोन्ही राजे दंड थोपटून एकमेकांसमोर उभे असलेले पहायला मिळाले. आताही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमावर शिवेंद्रराजेंनी जोरदार आरोप केले होते. उदयनराजेंची झालेली एण्ट्री यावर तर शिवेंद्रराजेंनी चांगलाच समाचार घेतला होता. असं असलं तरी या आधी वाढदिवसाला दोन्ही बंधू एकमेकांना कायम शुभेच्छा देताना पहायला मिळालेत. मात्र, यावेळी चाललेल्या राजकीय गरमागरमीमुळे दोन्ही राजे शुभेच्छा देण्यापासून अलिप्त राहिले.
उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर मला कोणीच फोन केला नाही. मला शुभेच्छा दिल्या नाहीत, असं उत्तर शिवेंद्रराजेंनी दिलं. दोन्ही राजेंच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने भावांमधील नात्यातली दरी वाढल्याचं पहायला मिळालं. 

उदयनराजेंनी 'चला हवा येवू द्या', 'बैलगाडी शर्यत', 'रिक्षा स्पर्धा' असे अनेक कार्यक्रम घेतले होते. या सर्व कार्यक्रमांना लाखो लोकांची उपस्थिती होती. परंतु, उदयनराजेंच्या या कार्यक्रमांवर आमदार शिवेंद्रराजेंनी टिका केली होती.

उदयनराजेंच्या हवेतून झालेल्या एण्ट्रीवर टीका करत ज्यांची कामच हवेत असतात ते हवेतच राहणार असं वक्तव्य केल‌ं होतं. यावरुन दोन्ही राजेंमध्ये चांगलच घमासान रंगलं. उदयनराजेंच्या झालेल्या जंगी वाढदिवसानंतर शिवेंद्रराजे कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणार याबाबत साताऱ्यात अनेक चर्चा रंगल्या होत्या.
आमदार शिवेंद्रराजे हॅलिकॉप्टरमधूनच एण्ट्री करणार अशा चर्चांना चांगलच उधान आलं होतं. मात्र, शिवेंद्रराजेंनी वाढदिवस साधेपाणाने साजरा करत सगळ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. परंतु, उदयनराजेंचा शुभेच्छा देण्यासाठी साधा फोनही आला नाही असंही शिवेंद्रराजेंनी सांगितलं आहे.


आता कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज !

वेध माझा ऑनलाइन - कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज ७% इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची योजना येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या संदर्भातील शासननिर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.

कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा व त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. देशामध्ये अशाप्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून पहिलीच योजना असणार आहे.

तसेच कारागृहात शिक्षा भोगत असताना तेथे काम करून मिळालेल्या उत्पन्नापोटी कर्ज  मिळणारी ही देशातील पहिलीच अभिनव कर्ज योजना ठरणार आहे. याद्वारे एक कल्याणकारी योजना मूर्त स्वरूपात येऊन अंदाजे १०५५ बंद्यांना, कैद्यांना योजनेचा लाभ होऊ शकतो, असे गृहमंत्री म्हणाले.
कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घमुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्याने अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरूंगात रहावे लागल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबीयांमध्ये औदासिन्य, नैराश्य, अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ शकते.तसेच तुरूंगात गेलेल्या व्यक्तीने कौटुंबिक कर्तव्यात कसूर केल्याची भावना कुटुंबात निर्माण होते. अशा परिस्थितीत बंद्यास, कैद्यास त्याच्या कुटुंबाच्या गरजेकरिता कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून दिल्यास बंदी/कैद्याबद्दल कुटुंबीयांमध्ये सहानुभूती व प्रेम वाढून कुटुंबातील वातावरण सुदृढ राहण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखांचा स्टेजवरच कापला खिसा... चोरटा कॅमेरात कैद...

वेध माझा ऑनलाइन - सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशामधून ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी मेळाव्याच्या दरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला आहे. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच हा प्रकार घडला आहे. चोरट्याने सेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशात नोटा लांबवतानाची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु आहे. सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल चोरट्याने चोरले आहे. सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले आहे.स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचे बंडल लांबवण्याची हिंमत केली आहे. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या आहेत. पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याविषयी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी ; गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार ; ना राजेश टोपेंची माहिती

वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. त्यामुळे निर्बंध बरेच कमी करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही घरीच साजरी करण्यात आली आहे. पण, यंदा आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि सण उत्सवाबद्दल माहिती दिली.

ते म्हणाले ,राज्य सरकारने जे काही निर्बंध लावले होते, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडत असतो. त्यानंतर मास्क मुक्त असेल किंवा सोशल डिस्टसिंगचे नियम असो, त्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मास्क लगेच हटवले जाणार नाही.  कारण कोरोनाची लाट जरी ओसरली असली तर धोका अजूनही कायम आहे. जर कुणी बाधित असेल तर त्यामुळे इतर लोक बाधित होऊ शकतात, त्यामुळे घाईघाईने मास्क बंदी हटवली जाणार नाही, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.
गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही घरीच साजरी करण्यात आली आहे. पण, यंदा आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचं आम्ही सर्वांनी स्वागत केलं आहे. तर गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनेच फोडला दवाखाना.. पाटण तालुक्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार..धिंगाणा घालणाऱ्या डॉक्टरला घेतले पोलिसांनी ताब्यात..

वेध माझा ऑनलाइन - पाटण तालुक्यातील हेलवाक प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड करण्यात आली आहे ही तोडफोड चक्क त्या केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यानेच केली आहे  डॉक्टरनेच दवाखाना फोडल्याचा प्रकार पाहून  अनेकजण अवाक झाले दरम्यान त्या डॉक्टरला कोयना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रात तोडफोड केली डॉक्टर महाशयांनी घातलेला हा धिंगाना पाहून रुग्ण आणि नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.. दरम्यान सदरचे वैद्यकीय अधिकारी हे मानसिक रुग्ण असल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती.. स्वतः डॉक्टरांनीच हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली तोडफोड ही सर्वांनाच अवाक करणारी होती मनोरुग्ण असणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोयना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या मनोरुग्ण वैद्यकीय अधिकार्‍याला ताब्यात घेतले आहे.. या वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत यापूर्वीही अशा अनेक तक्रारी आल्याचे सांगितले जाते.. 

Tuesday, March 29, 2022

आताची सर्वात मोठी बातमी ; शरद पवार करणार युपीए चे नेतृत्व ? ; अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव झाला मंजूर ;

वेध माझा ऑनलाइन - भाजपला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात असताना आज दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. सर्वानुमते शरद पवारांनी नेतृत्व करावं यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी संसदीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. सध्या देशात सर्व बिगर-भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्यात शरद पवार हे मोठी भूमिका बजावू शकतात'', असं मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या बैठकीत व्यक्त केलं. 

मेहबूब शेख यांनीच या बैठकीत शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं असा प्रस्ताव मांडला आणि बैठकीला उपस्थित नेत्यांनी सर्वानुमते त्यास अनुमोदन दिलं. या ठरावावर आता शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात...आरबीआयच्या आकडेवारीचा हवाला...

वेध माझा ऑनलाइन - सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांनी चिंता लागते की बँकेचे लोक घरी तर येणार नाही. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र दुसरीकडे गेल्या 7 वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे दररोज 100 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मात्र, एकूण नुकसानीचे प्रमाणही वर्षानुवर्षे कमी होत आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने आरबीआयच्या आकडेवारीचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणूक महाराष्ट्रात घडली आहे, जिथे देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे 50 टक्के घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.
या 5 राज्यांमध्ये गेल्या सात वर्षांत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे, जी एकूण रकमेच्या सुमारे 83 टक्के आहे. अहवालानुसार, 1 एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक आढळून आली आहे. या अहवालानुसार, फसवणूक प्रकरणांचा तत्पर अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे घट झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळा सुरू राहणार... की नाही ? ; याबाबत नवीन अपडेट आली समोर...

वेध माझा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू राहणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू राहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुलांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचं वेड असतं. बऱ्याचदा वर्षभरापासून कुटुंबात त्याचं प्लानिंग सुरू असतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत असं करीन..उन्हाळ्याच्या सुट्टीत तसं करूया...अशी अनेक तयारी सुरू असते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीमुळे विद्यार्थी हिरमुसले होते. मात्र शिक्षण आयुक्तांच्या अपडेटमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एका वृत्त वाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ; आदित्य ठाकरे सुरक्षित; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक ब्रेक लावल्यामुळे दोन गाडीची टक्कर झाली अन् किरकोळ अपघात झाला. यामध्ये गाडीचं नुकसान झाले आहे. कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे मालवण येथील रॅलीला संबोधित करणार आहेत. येथून आदित्य ठाकरे यांनी आपला तीन दिवसाचा कोकण दौरा सुरु केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याने शिवसेना कोकणातील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेनेची कोकणात आधीच मोठी ताकद आहे. ही ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. कोकण शिवसेनाचा गढ मानला जातो. यावर राष्ट्रवादी आणि भाजपचा डोळा आहे.
दरम्यान या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आलीआहे. मात्र या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत.

आज मुंबई विमानतळावर शरद पवारांचा पाहण्यास मिळाला साधेपणा... काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या 81 व्या वर्षी सुद्धा राज्यभरात पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे दौरे करत असतात. अगदी ठरल्यावेळी शरद पवार बिनचूक दौरा करत असतात. आज मुंबई विमानतळावर शरद पवारांचा साधेपणा पाहण्यास मिळाला. व्हीआयपी रांग सोडून त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश केला. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले होते. दिल्लीला जाण्यासाठी ते मुंबई विमानतळावर पोहोचले होते. नेहमी व्हीआयपी व्यक्तींना विमान प्रवासात वेगळ्या रांगेतून प्रवेश दिला जात असतो. मागील जागेवरील सर्व प्रवाशी आत गेल्यानंतर व्हीआयपी व्यक्तींना प्रवेश दिला जातो.
पण, शरद पवार यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी रांगेत उभं राहून विमानात प्रवेश केला. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपल्यासोबत रांगेत उभे असलेल्याचे पाहून प्रवाशीही अवाक् झाले होते.  





शरद पवारांनी आयुष्यभर आग लावण्याचे काम केले ; त्यांचे पवार आडनाव बदलून 'आगलावे' करावे; शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जहरी टीका ...

वेध माझा ऑनलाइन - शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथं आग लावायची एवढेच त्यांचे राज्यात काम आहे. त्यांचे आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांचे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावे अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साेलापूरात केली. 

सदाभाऊ खोत हे साेलापूर दाै-यावर आज (साेमवार) आले आहेत. साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करीत महाविकास आघाडी सरकारचा कारभार शेतक-यांच्या मुळावर आल्याचे म्हटलं.

दरम्यान सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊंनी पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले जाईल तिथे पवार साहेब काड्या लावण्याचे काम करीत असतात. खरं तर ते महान नेते आहेत. मात्र एकीकडे आग लावल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच्या (ठिकाणी) घराला आग लावायला निघून जायचं. त्यांचे आयुष्यच आग लावण्यामध्येच गेलं. त्यामुळे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावं.

गडकरींची विधेयकास मंजुरी ; ऑक्टोंबर पासून सर्वच कारमध्ये 6 एअर बॅग्स कम्पलसरी...

वेध माझा ऑनलाइन - देशातील सर्वच नवीन कारमध्ये 1 ऑक्टोबर 2022 पासून 6 एअरबॅग असणे अनिवार्य असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. रस्ते व राजमार्ग मंत्रालयाने जानेवारी महिन्यात एक विधेयकास मंजुरी दिली होती. त्यानुसार, 8 प्रवाशांची वाहतूक क्षमता असलेली आणि 3.5 टन पेक्षा कमी वजन असणाऱ्या सर्वच कारमध्ये 6 एअर बॅग अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे, 1 ऑक्टोबरपासून सर्वच वाहनात ड्युअर फ्रंट एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. 

कारमध्ये वाढीव एअरबॅग अनिवार्य केल्यामुळे कारच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे. ऑटो एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार या नियमामुळे कारच्या किंमती 50 हजार रुपयांनी वाढू शकतात. सध्याच्या कार मॉडेलमध्ये साईड आणि कर्टेन एअरबॅगची कमतरता जाणवते. त्यामुळे, बॉडी पॅनेल आणि इंटेरियर ट्रीममध्येही काही बदल होऊ शकतात. ज्यामुळे गाडीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, सध्या गाड्यांमध्ये मीड-व्हेरिएंट आणि टॉप वेरिएंट मध्ये 6 एअरबॅग देण्यात येत आहेत. 

Monday, March 28, 2022

आदित्य ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला दिला पूर्णविराम... ठाकरे म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन - त्यांच्याकडून जी वागणूक येतंय. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. मुळात आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे? असा सवाल उपस्थितीत करत शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहे. आज कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
' त्यांच्याकडून जी वागणूक दिली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कुटुंबावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे? असं म्हणत पुढील काळात भाजपशी मैत्रीचा विषय आदित्य ठाकरेंनी संपवला.
'राजकीय षडयंत्र सुरू आह, बिगर भाजप राज्यात सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला जात आहे.  पण टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत घाणेरडं राजकारण थांबला पाहिजे. हातात राज्याची सत्ता नसल्यामुळे नैराश्यातून हे सुरू आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.
'दोन पक्ष जिथं एकमेकांविरोधात लढलोय तिथं नाराजी असणं स्वाभाविक आहे. वरिष्ठ नेते लक्ष घालत आहे,  तानाजी सावंत यांचे वैयक्तिक मत होते. भेदभाव न करता पुढे जावं लागेल. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं म्हणत तानाजी सावंत यांच्या विधानावर आदित्य ठाकेरेंनी बोलण्याचं टाळलं.

वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळला ! ; महाराष्ट्र अंधारात जाणार ?

वेध माझा ऑनलाइन - देशभरातील कर्मचारी संघटनांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील वीज कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. आज दुपारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. मात्र, आता एक मोठी बातमी आली आहे. उद्या वीज कर्मचारी संघटनांसोबतची होणारी बैठक ऊर्जामंत्र्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे आता वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असून महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल,अशी ग्वाही वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून दिली. तसेच उद्या दुपारी मंत्रालयात प्रत्यक्ष बैठक घेऊन सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करू, कृपया संप मागे घ्या, अशी विनंती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना केली.
मात्र, संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद न मिळाल्याने उद्याची नियोजित बैठक ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी रद्द केल्याचं सांगितलं आहे. वीज कर्मचारी संघटनांसोबत उद्या दुपारी 3 वाजता बैठक होणार होती. आता वीज कर्मचारी आपला संप मागे घेण्यास तयार नसल्याने महाराष्ट्रात वीज पुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे न घेतल्यास आता राज्य सरकार कठोर अंमलबजावणी करणार आहे.

काय आहेत वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांचे सुरू असलेले खाजगीकरण थांबवावे.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांत कार्यरत असलेले कंत्राटी कामगार यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीत संरक्षण द्या

केंद्र सरकारच्या विद्युत (संशोधन) बिल 2021 खाजगीकरण धोरणाला वीज कर्मचाऱ्यांकडून विरोध

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांत रिक्त पदे भरण्यात यावी

महानिर्मिती कंपनी संचलित करत असलेले जलविद्युत केंद्र खाजगी उद्याजकांना देण्याचं धोरण थांबवण्यात यावे.

आज कोळे येथे बैलगाडी स्पर्धा ; भाजपाचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

वेध माझा ऑनलाइन -  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कोळे (ता. कराड) येथे  आज बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शासकीय नियमांचे पालन करून ही शर्यत होणार आहे.

डॉ. अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीत प्रथम विजेत्यास हॉटेल रॉयल लँडस्केप (विंग) यांच्यावतीने ५१,१११ रुपयांचे रोख बक्षिस, द्वितीय क्रमांकास अनन्या इन्फ्रास्ट्रक्चर (संजयनगर-शेरे) यांच्यातर्फे ४१,१११ रुपये, तृतीय क्रमांकास कृष्णा बँकेचे संचालक हेमंत पाटील यांच्याकडून ३१,१११ रुपये, चतुर्थ क्रमांकास कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांच्यातर्फे २१,१११ रुपये, पाचव्या क्रमांकास कोळेवाडीच्या नेमाने बापू यांच्यातर्फे ११,१११ रुपये तर सहाव्या क्रमांकासाठी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्यातर्फे ७,१११ रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहेत. बैलगाडी मालकांनी शासकीय नियमांनुसार स्पर्धेचे नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

गोरेगाव फिल्म सिटीला ड्रग्स सप्लाय करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात ; फिल्म इंडस्ट्रीत कोणाला ड्रग्सचा सप्लाय होतो याचा तपास सुरू...

वेध माझा ऑनलाइन - मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी 4 ऑटो रिक्षा ड्रायव्हरला ड्रग्ससह अटक केली आहे. ते रिक्षा चालवण्याच्या आड ड्रग्सची तस्करी करीत होते. ही गँग घाटकोपर भागातून ड्रग्स घेऊन गोरेगाव फिल्म सिटीमध्ये सप्लाय करीत होती. पोलिसांनी घटनास्थळाहून गांजा जप्त केला आहे आणि एक ऑटो रिक्षा जप्त केली आहे. या प्रकरणात चार आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणात तपास सुरू आहे.

दिंडोशी डिव्हीडनचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटीलची टीम गस्त घालत होती. यादरम्यान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्वामी नारायण मंदिर मालाड पूर्वेजवळ निर्जंन ठिकाणी काही संशयास्पद रिक्षा दिसल्या. पोलीस जेव्हा टीम घेऊन रिक्षाची चौकशी करायला पुढे गेले तर चालक रिक्षा घेऊन पळू लागले. यानंतर पोलिसांच्या टीमने रिक्षाचा पाठलाग गेला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तर रिक्षात गांजा सापडला. पोलिसांनी सर्व 4 आरोपी आणि रिक्षा जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात मो. हुसैन कुरैशी (38)अब्दुल रज्जाक मो. रफीक शेख(31)सलीम आजम शेख( 24)मो.अली निजामुद्दीन खान(24) यांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्वजण घाटकोपर भागात राहणारे आहेत. पोलिसांनी ड्रग पेडलर्सनाही कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडीत पाठवलं आहे. याशिवाय फिल्म सिटीमध्ये कोणाला ड्रग्स सप्लाय केला जातो, याचाही शोध सुरू आहे.

कराडमध्ये ‘अतुलोत्सव २०२२’ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद ; रांगोळी, रंगभरण, हस्ताक्षर स्पर्धेत सुमारे ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग


वेध माझा ऑनलाइन - 
कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे आयोजित ‘अतुलोत्सव २०२२’ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृह आणि शिवाजी हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धांचे उद्‌घाटन कृष्णा स्कूलच्या प्राचार्या स्नेहल निकुंब यांच्या हस्ते आणि मुख्य संयोजक सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर चव्हाण, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, सचिन पवार, स्पर्धा समन्वयक अशोक सोमदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध वयोगटात घेण्यात आलेल्या या स्पर्धांपैकी रांगोळी आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर करुन, विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या बक्षिस वितरण कार्यक्रमात मलकापूरचे माजी नगरसेवक वसंतराव शिंदे, सुधाकर चव्हाण, बी. बी. साळुंखे, स्नेहल निकुंब, सतीश चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

आमदारांना घरे द्यायला पाहिजेत की नको ? ; काय आहे शरद पवारांचे वैयक्तिक मत ? ;

वेध माझा ऑनलाइन - मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात केली. यानंतर या निर्णयावरुन अनेक मतमतांतर येत आहेत. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरे द्यायला नकोत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून आमदारांना घरं द्या : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.  गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या, अशी पवारांची भूमिका आहे. लवकरच शरद पवार या विषयवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शरद पवारांचा सरकाराला घरचा आहेर अशी विरोधकांची टीका होत आहे, या टीकेला मी किंमत देत नाही, असे देखील शरद पवारांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

मोठी बातमी ; आता हटवले जाणार सर्व टोल प्लाझा...नितीन गडकरींनी केली घोषणा...

 वेध माझा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अनेक कामं केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यासाठी सातत्याने मोठी पाऊलं उचलत आहेत. रस्त्यांपासून सुरक्षेपर्यंतची अनेक कामं मजबूत करण्याकडे त्यांचा कल आहे. आता नितीन गडकरी यांनी आणखी एक घोषणा केली आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच GPS आधारित टोल ट्रॅकिंग सिस्टम आणणार आहे. त्यानंतर जनतेला टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. GPS इमेजिंगद्वारे टोलची रक्कम वसूल केली जाईल.

हटवले जाणार सर्व टोल प्लाझा -

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं, की आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. म्हणजेच रस्त्यावर आता कोणतीही टोल लेन नसेल. टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जात आहे. ज्यात तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी सरकार लवकरच एक धोरण आणणार आहे.
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या सुविधेसाठी टोल लेन रद्द केली जाईल. त्याऐवजी नॅशनल हायवेवर दर 60 किमीच्या अंतरावर एक टोल प्लाझा असेल. तसंच मध्येच असलेले सर्व टोल पुढील तीन महिन्यात हटवले जातील. टोल प्लाझा हटवले गेल्याने प्रवाशांना कुठेही टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही. तसंच लोकांचा वेळही वाचण्यास मदत होईल. GPS Toll Collection पद्धतीत चालकाच्या बँक खात्यातून थेट पैसे कट केले जातील. या टोल कलेक्शनच्या पद्धतीने भविष्यात नागरिकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जितक्या रोडचा वापर करण्यात आला, तेवढाच टोल द्यावा लागेल.
GPS बेस्ड टोल सिस्टम लागू झाल्यास हे जीपीएस, वाहन ट्रॅकिंग डिव्हाईस किंवा ट्रान्सपोंडरसह फिट करावं लागेल. जीपीएस इमेजिंगच्या मदतीने तुमच्या प्रवासाच्या आधारे तुमचा टोल आकारला जाईल. त्याशिवाय GPS टोल कलेक्शन करण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंगचा उपयोग केल्यास, तुमच्या प्रवासाचे सर्व डिटेल्स ट्रॅक केले जाऊ शकतात.

Sunday, March 27, 2022

आता येणार लोडशेडिंगचे संकट !

वेध माझा ऑनलाइन - वेगवेगळ्या मांगण्यासाठी राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगारांनी  संपाचे हत्यार उपसले आहे. तर दुसरीकडे 48 तासानंतर राज्यावर लोडशेडिंगचे मोठे संकट येऊन उभे ठाकले आहे.  कोल इंडियाच्या युनियन  दोन दिवसांच्या संपावर गेल्याने कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे लोडशेडिंग करावी लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी व कामगार दोन दिवसीय म्हणजे २८ आणि २९ मार्च रोजी संपावर गेले आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपात कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेली आहे. त्यामुळे दोन दिवस कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. या संपामुळे देशपातळीवर वीजनिर्मिती प्रभावित होणार आहे.
पारस, नाशिक व भुसावळ येथील वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. तसंच, कोराडी, खापरखेडा व चंद्रपूरचे वीज निर्मिती संच देखील प्रभावित होणार आहे. त्यामुळे राज्यात 48 तासानंतर लोडशेडिंगची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


म्हणून शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली...मी सगळ्यांना पुरून उरणारा -खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा इशारा...

वेध माझा ऑनलाइन - सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार मला व आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून तोही या सर्वांना पुरून उरणारा आहे असा इशारा भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. शायनिंग महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनीही हजेरी लावली होती.    

माढा लोकसभा मतदारसंघाचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. याची दखल घेत तातडीने फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय दूर संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा समावेश असणाऱ्या शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप आणि भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशांमधील आदर्श खासदारांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या विविध योजना ह्या सर्वसामान्य नागरिकांना कळाव्यात व त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा, यासाठी शाइनिंग महाराष्ट्र हे महा प्रदर्शन त्यांनी आयोजित करून चांगला पायंडा पाडला आहे.  या  महाप्रदर्शनामुळे केंद्रीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळलेली आहे व आगामी काळामध्ये सुद्धा अशाच विविध योजनांच्या द्वारे केंद्र सरकारची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवण्यात येईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री ना. देवूसिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो.जनतेला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही आगामी काळामध्ये मुंबईवरून हैदराबादकडे जाणारी बुलेट ट्रेन फलटण व अकलुज मार्गे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच माढा लोकसभा मतदार संघ विकासात आघाडीवर असेल असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केले. प्रास्ताविक जयकुमार शिंदे यांनी केले तर आभार अनुप शहा यांनी मानले.

...म्हणून शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा शरद पवार व विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तर खा शरद पवार पूर्वी निवडून गेले होते. परंतु भाजपच्या उमेदवारापुढे आपला टिकाव लागणार नाही हे कळल्यानंतर त्यांनी ही माघार घेतली होती. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझ्या विरोधात खेळलेल्या षडयंत्रामध्ये कधीही हारलो नाही त्यामुळे कोणत्याही आंडुपांडूच्यासमोर सुद्धा आपण हरणार नाही असा इशारा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  केले.

मोठी दुर्घटना ; पाण्याच्या टाकीत 4 कामगार पडले ; दोघांचा मृत्यू...कुठे घडली ही दुर्घटना...?वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - ठाण्यात इमारतीची टाकी साफ करण्यासाठी  आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी चार जण टाकीत कोसळले. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील नौपाडा येथील मोनालिसा इमारती शेजारी असलेल्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीतील पाण्याच्या टाकीत हे चार कामगार पडले.

या ठिकाणी एकूण चार कामगार काम करत होते आणि त्यापैकी 2 कामगारांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे तर 2 कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोन्ही कामगारांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केमिकलमुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून या 2 कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती देताना नौपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितलं की, मराठा सेवा मंडळाची ही इमारत आहे. या इमारतीतील पाण्याची टाकी साफ करण्याचं कंत्राट एका ठेकेदाराने घेतलं होतं. त्यासाठी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काम सुरू केलं. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी एक केमिकल टाकलं होतं. त्यानंतर टाकी साफ करण्यासाठी दोन कामगार खाली उतरले.
या दोन्ही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केला. त्यानंतर इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बचावकार्य केलं. या चार कामगारांपैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन कर्मचाऱ्यांची स्थिती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

पुण्यात शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले, चौघांचा मृत्यू

2 मार्च रोजी पुण्यात अशाच प्रकारची एक घटना घडली होती. शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. त्यापैकी तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हॉटेल प्यासा जवळ असलेल्या परिसरात ही घटना घडली आहे. शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी तरुण आले होते. यावेळी चार तरुण टाकीत पडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला.

आज सातारा जिल्हा कोरोनामुक्त...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 0 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 0 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 0 माण 0महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 0 वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 0 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 0 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

डॉ अतुलबाबांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिणमध्ये विविध सामाजिक स्पर्धांचे आणि उपक्रमांचे आयोजन ; पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अतुलबाबा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कराडमध्ये उपलब्ध नाहीत...

वेध माझा ऑनलाइन -  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सोमवारी (ता. २८) वाढदिवस आहे. यानिमित्त कराड दक्षिणमध्ये विविध संस्थांच्यावतीने सामाजिक उपक्रमांसह विविध स्पर्धांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सोमवारी डॉ. अतुलबाबा भोसले हे बाहेरगावी असल्याने, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते कराडमध्ये उपलब्ध नसतील, असे कळविण्यात आले आहे.

अजितदादा राज्य तुम्हीच चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात'; राजू शेट्टींचा हल्लाबोल

वेध माझा ऑनलाइन - माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात असं शेट्टी म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर टोला लगावला. 'दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात' असं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं. बारामती तालुक्यातील निंबुत गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आयोजीत कार्यक्रमात शेट्टी बोलत होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टींनी दूध व्यवसायाबद्दल प्रतिक्रिया दिली. दूध भेसळीबाबत कडक धोरण करण्याची गरज आहे. दुधाचा व्यवसाय अडचणीत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत दूध विकावं लागलं. त्यामुळं शेतकऱ्यांना गाई विकाव्या लागल्या. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. दुधाचे दर वाढले आहेत. लॉकडाऊन काळात दुधाचे दर कमी झाले होते. त्यामुळं गाई कमी झाल्या. त्यामुळं सरकारनं आता दूध खरेदीत सहभाग घ्यावा, अन्यथा आपलं राज्य दूध उत्पादनात मागे पडेल असे मतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.
 दरम्यान, महाविकास आघाडीच्या कामाबाबत मंथन केलं जाईल. शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केल हा प्रश्न आहे? उसाच्या एफआरपी चा मुद्दा असेल, भूसंपादनाचे कायदे असतील हे सरकारने निर्णय घेतले आहेत. त्यावर मंथन केलं जाईल आणि त्यांनंतर महाविकास आघाडीसोबत राहायचं की नाही ते ठवरल जाईल, असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितले.

मी 11 फेब्रुवारीला शरद पवार यांना पत्र दिले होते. त्याच उत्तर मला अद्याप मिळालेलं नाही असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, लोकभारती व इतर छोटे-मोठे पक्ष यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आजकाल कवडीचीही किंमत देत नाहीत. वैचारिक बांधिलकीमुळं हे छोटे पक्ष भाजपला पाठिंबाही देऊ शकत नाहीत व तिसरी आघाडीही करु शकत नाहीत. या त्यांच्या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन महाविकास आघाडीतील मोठे पक्ष त्यांना गृहित धरत आहेत. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असे अनेक निर्णय राज्य सरकारनं घेतले आहेत. यात वेळीच बदल केले नाहीत तर सत्तेचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही. अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख करणारे पत्र  राजू शेट्टींनी शरद पवार यांना लिहले होते. मात्र, त्याचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे शेट्टी म्हणाले.


Saturday, March 26, 2022

कराडच्या प्रीतिसंगम उद्यानात साकारतेय विश्व शांतिदूताची संकल्पना ; या संकल्पनेचे शहरातून होतय कौतुक...

वेध माझा ऑनलाइन - माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराडच्या प्रीतिसंगम उद्यानात विश्व शांतीदूत ही संकल्पना साकारत आहे याद्वारे शांतीचा संदेश देण्याचा मानस आहे कला क्रीडा साहित्य संसकृतीचा वारसा असणाऱ्या कराड नगरीत सहा ठिकाणी या कलाविष्कार दाखवणाऱ्या संकल्पना साकारण्यात येणार आहेत तसेच ज्या ठिकाणी सुशोभीकरण अद्याप झालेले नाही अशा सर्व ठिकाणी या कलाविष्कारी संकल्पना साकारल्या जाणार आहेत


यामध्ये सोमवार पेठ पाण्याची टाकी कन्याशाळा कमलेशवर कारंजे पी डी पाटील उद्यान व शिवाजी उद्यान तसेच ज्या ठिकाणी सुशोभीकरण झाले नाही अशा सर्व ठिकाणी या कलाविष्कारी संकल्पना साकारल्या जाणार आहेत अशी माहिती सी ओ डाके यांनी दिली दरम्यान याबाबतचे  कामकाज पूर्वीच सुरू झाले असून प्रीतिसंगम येथील शांतिदुत संकल्पनेचे काम पूर्णत्वासही गेले आहे
कराड शहर व परिसरातून स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत असे अनेक उपक्रम होत असल्याने शहरातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे

पेट्रोल डिझेल दर पुन्हा वाढले...

वेध माझा ऑनलाइन - जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 82 तर डिझेल 81 प्रति लिटरने वधारणार आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्यानं तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.




आज राज्यात 138 रुग्णांची नोंद तर 137 रुग्ण कोरोनामुक्त...सातारा जिल्ह्यात आज 4 बाधीत आढळले आहेत...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून  आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या  893 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 138   रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात  137  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.दरम्यान आज सातारा जिल्ह्यात 4 बाधीत आढळले आहेत..कराडमध्ये 2 माण आणि सातारा तालुक्यात प्रत्येकी 1 ,1 बाधीत सापडला आहे...

राज्यात आज  एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24, 697  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 92, 08, 961  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

राज्यात सध्या  893 अॅक्टिव्ह रुग्ण 

राज्यात सध्या 893 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  252 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 159 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

देशात कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट

देशात आज कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1660 नवीन रुग्ण आढळले असून 4100 लोकांचा मृत्यू झाला आहे (या मृत्यूंमध्ये काही राज्यांमधील आधी नोंद न झालेल्या मृत्यूंचा समावेळ आहे). काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 16 हजार 372 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात 2 हजार 349 रुग्ण कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 741 झाली आहे.

अतुल होनकळसे यांना संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार जाहीर...मुंबईत २७ मार्चला होणार पुरस्काराचे वितरण...

वेध माझा ऑनलाइन - साप्ताहिक आयुष्यमानचे संपादक व एजेएफसी संघटनेचे विश्वस्त अतुल होनकळसे यांना यंदाचा ajfc पत्रकार संघटनेचा दिला जाणारा संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.उद्या रविवार दि.२७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता मालाड-मुंबई येथे
या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती एजेएफसी संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी दिली.
       
पत्रकार अतुल होनकळसे हे गेल्या दोन दशकापासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत दैनिक प्रीतिसंगम रत्नागिरी टाइम्स लोकमंथन यामधून त्यांनी कराड प्रतिनिधी म्हणून काम केले आहे गेल्या दहा वर्षांपासून साप्ताहिक आयुष्यमानचे संपादक म्हणून ते कार्यरत आहेत अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून त्यांची शासन दरबारी नोंदही आहे यापूर्वी त्यांना पत्रकार युवा रत्न पुरस्कार तसेच पत्रकार भूषण  पुरस्कार व चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पूरस्कार आदी पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले आहे ajfc पत्रकार संघटनेचा यावर्षीचा दिला जाणारा संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला आहे उद्या दिनांक 27 रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक तो होनकळसे याना प्रदान करण्यात येणार आहे त्यानिमित्त अतुल होनकळसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

31 मार्चपर्यंत पुन्हा कामावर रुजू व्हा ; अन्यथा...अजित पवारांचा एस टी कर्मचाऱ्यांना इशारा...

वेध माझा ऑनलाइन - संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च, २०२२ पर्यंत एसटीच्या संपकऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोन्ही सभागृहात केले. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. 

अजित पवार यांनी एसटी कर्मचार्‍यांना पुन्हा कामवर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. तसं न केल्यास पवार यांनी कर्मचार्‍यांना इशारा दिला आहे. "३१ मार्चपर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं. तसेच आपलं आपलं काम सुरू करावं. ३१ मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्र त्यांना वेगळी संधी मिळणार नाही" असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. 
गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती व अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात निवेदन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८ % करण्यात आला, घरभाडे भत्ता ७ %, १४ % २१ % वरुन ८ %, १६ % आणि २४% टक्के करण्यात आला तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये  सेवाकालावधीनुसार रुपये ५०००, रुपये ४००० व रुपये २५०० अशी वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये ७००० ते ९००० रुपये वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये ६३ कोटीपेक्षा जादा भार पडला आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे.  त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने ग्वाही घेतली आहे.
संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसताना  कर्मचाऱ्यांना २५०० ते ५००० रुपये दिवाळी भेट म्हणून दिले. यामुळे महामंडळावर सुमारे २४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला. कृती समिती संघटनेने केलेल्या सर्व मागण्या मान्य  केल्या असतानाही कर्मचारी संपावर ठाम राहिले. हे कामगार वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच  कामगारांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका.  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यास कोणीही बंदी घातलेली नाही. त्यांच्यावरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती या सारख्या कारवाया आम्ही मागे घेतल्या आहेत. त्यामुळे ३१ मार्च, २०२२ पर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे असं आवाहन ठाकरे सरकारनं केले आहे.
 


कारला डंपरची मागून धडक ; एकाच कुटूंबातील चौघे ठार...

वेध माझा ऑनलाइन - कारला डम्परने मागून धडक दिल्याने मलकापूर (ता;कराड) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पेठ - सांगली रस्त्यावर गाताडवाडी नजीक शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरचे व्यावसायिक अधिकाराव पोळ पत्नी सुषमा भावजय सरिता सुभाष पोळ आई गीताबाई (सर्व रा. पोळ वस्ती मलकापूर-कऱ्हाड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात पुतणी थोडक्यात वाचली हे कुटुंबिय घरगुती कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले 

प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ ,; न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला...मुंबै बँक निवडणुक प्रकरण...

वेध माझा ऑनलाइन - प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक  निवडणुकीसाठी मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल केला होता. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दरेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आता मुंबई सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

प्रथमदर्शनी पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचे दिसून आले आहे असं न्यायालयाने म्हटलं असून त्याच्या आधारेच प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. प्रविण दरेकर यांचा जामिन अर्ज फेटाळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी 2017 मध्ये मजूर म्हणून संस्थेकडून मोबदला स्वीकारला आहे आणि त्यावेळेस ते नागपूरला होते अशी माहिती समोर आली आहे.
हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रवीण दरेकर यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज केला आहे की, आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात अपील करायचं आहे आणि जोपर्यंत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आम्ही अर्ज करत नाही तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.

Friday, March 25, 2022

महागाईचा भडका ; -आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये १ एप्रिलपासून होणार वाढ ;

वेध माझा ऑनलाइन - इंधन दरवाढ सुरू असताना आता औषधांच्या किमतीदेखील वाढणार आहेत. आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार आहेत. जवळपास ८०० औषधांचे दर १० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं महाग होणार आहे.

उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं महागणार आहेत. वेदनाशामक आणि एँटी बायोटिक फिनायटोईन सोडियम, मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांवरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीनं (एनपीपीए) सांगितलं.
 
औषधांच्या किमती वाढवल्या जाव्यात अशी मागणी कोरोना संकट आल्यापासून या क्षेत्रातील कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आवश्यक औषधांच्या किमती वाढतील. कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दरही वाढणार आहेत.

Thursday, March 24, 2022

कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता,; भाजपा आमदार नितेश राणेंचा खळबळजनक आरोप...

वेध माझा ऑनलाइन -  कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते विधानसभेच्या सभागृहात बोलत होते. 

नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत चांगलेच राजकारण रंगले होते. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यावेळी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.माझ्याकडे पेन डाईव्ह आहे तो मी न्यायालयात देणार असंही आमदार नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले की, माझ्याकडे पुरावा आहे, आम्ही सिद्ध करू शकतो. ८ तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या पार्टीत होता. त्याचे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात देऊ, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

कोरोना रुग्णसंख्या कमालीची घटतेय; तरीही काळजी घ्या! मागील 24 तासात किती रुग्ण?

वेध माझा ऑनलाइन - देशामध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज कोरोनाचे आकडे कमी झाल्याचं दिसत आहे.मागील 24 तासात कोरोनाचे नवीन 1685 रुग्ण समोर आले आहेत तर 83 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. काल देशात 1938 केसेस समोर आल्या होत्या तर 67 लोकांचा मृत्यू झाला होता.  

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात  2 हजार 499 लोक कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 21 हजार 530 वर आली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 16 हजार 755 मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 4 कोटी 24 लाख 78 हजार 87 कोरोनातून संसर्गमुक्त झाले आहेत. 

देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.  सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींचे 182 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल देशात 29 लाख 82 हजार 451 लसींचे डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत 182 कोटी 55 लाख 75 हजार 126  डोस लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 


यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही ;

वेध माझा ऑनलाइन - देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थितीसह शाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.. मात्र यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना मुकावं लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी ; मोठी बातमी

वेध माझा ऑनलाइन - गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देभरभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. मागील काही महिन्यापासून हे निर्बंध शिथिल करून हळूहळू शाळा सुरु  करण्यात आल्या होत्या. मात्र आता संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह  सुरू करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे. परिपत्रक जारी करून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

या परिपत्रकानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
तसंच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत. तसंच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

फडणवीसांचा आणखी एक पेंड्राईव्ह बॉम्ब ; मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर केला जोरदार हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाइन - अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देवेद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे नेते आणि मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर ईडीकडून टाकण्यात आलेल्या धाडीचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे जेव्हा धाड पडली. पहिल्यांदा 130 कोटी आणि नंतर ती वाढता वाढता 300 कोटींची बेहिशोबी संपत्ती सापडली. दोन वर्षांत 38 संपत्ती त्यांनी जमवल्याचा पूर्ण रेकॉर्ड सापडला आहे. असं प्रशिक्षण घेऊ नका असं प्रशिक्षण घेतल्यास आर्थर रोडमद्ये जावं लागतं. इथं लोक कोरोनामुळे मरत होते आणि तिकडे संपत्ती खरेदी सुरू होती. प्रॉपर्टी खरेदीचा रेटही पाहा 24 महिन्यात 38 प्रॉपर्टीची खरेदी.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीतही सहा हाजर कोटी रुपयांचे 370 प्रस्ताव 30 मिनिटांत मंजूर करुन टाकले. भूमिगत जल भोगदा, मनपा रुग्णालय इमारत बांधकाम, मलनिस्सारण योजनेसाठी पैसे, रुग्णालयातील विविध कामे, अग्निशमन दल वाहन खरेदी, पण हे सर्व करत असताना नाले सफाईचा विषय निघाला नाही. आता पावसाळा येणार आहे आणि शेवटच्या सभेतही नालेसफाईचा विषय आला नाही. पण बांधकामाचे विषय हे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले.
7 मार्च रोजीचं स्थायी समितीच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज पहा. काय लाईन लागली होती ती.... भयानक होती. आजकाल पेन ड्राईव्ह दिला तर लोकांना राग येतो. पण तुम्हाला हवा असेल तर तिथल्या लागलेल्या लाईनमध्ये कोण-कोण होतं, कोण आत जात होतं कोण बाहेर येत होतं याचा पेन ड्राईव्ह द्यायला मी तयार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पेट्रोल-डिझेलचा कर आपण कर कमी केला नाही. पण दारू वरील कर 50 टक्के केला, बार लायसन्सच्या नुतनीकरणावर 50 टक्के सूट दिली. नव्याने दारू विक्रीचा परवाना दिला. चंद्रपूरची दारू बंदी मागे घेतली. कोरोनाच्या काळात मंदिरे बंद होती आणि मद्यालय सुरू होती. क्लास बंद होती  ग्लास सुरू होते. महाराष्ट्र मद्यराष्ट्र करण्याचं जे काम चाललं आहे... या संदर्भात अनेक विषय माझ्याकडे आहेत पण मला असं वाटतं की, एकच मुद्दा मला मांडावा वाटतो की, ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या अनिल अवचट यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री परवान्याचा निर्णय घेतला असंही फडणवीस म्हणाले.

आज जिल्ह्यात 0 बाधीत,7 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 0 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 0 माण 0महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 0 वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 0 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 7 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

इंस्टाग्रामवरून हत्यारे मागवण्यात आली ; पुणे जिल्ह्यात सापडला अवैध शस्त्रसाठा ; गृहराज्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती...

वेध माझा ऑनलाइन -  राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत महत्वाची माहिती दिली. सोशल मीडियाचा वापर शस्त्र मागवण्यासाठी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  इन्स्टाग्रामवरुन ही  सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत दिली. 

 
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत आमदार राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना राहुल कुल  यांनी सांगितलं की, पुण्यात गावठी 5 पिस्तूल, 19 जिवंत काडतुसं सापडली. हे खूप गंभीर आहे.  पाटस आणि दौंड पोलिस स्टेशन देखील प्रलंबित आहेत, हे सुध्दा बघितले पाहिजे, असं कुल म्हणाले. 
यावर बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, आठपैकी 6 आरोपी पकडले, जे सध्या बेलवर बाहेर आहेत. परराज्यात 1 टीम पाठवली होती. पण बाकीचे आरोपी आढळले नाहीत. आता पुन्हा टीम पाठवू. इन्स्टाग्रामवरुन ही सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत दिली. 


आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर : धक्कादायक माहिती उघड ; एकास अटक...

वेध माझा ऑनलाइन - इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 15 वा सिझन आता दोन दिवसांवर आला आहे. 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. त्या स्पर्धेसाठी सर्व टीमचे खेळाडू, कोचिंग स्टाफ मुंबईत दाखल झाला आहे. यंदा आयपीएलमधील साखळी फेरीतील सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होणार आहे. आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) एकाला अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यानं वानखेडे स्टेडिअम नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल तसेच खेळाडूंचा हॉटेल ते स्टेडिअमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली आहे. 'फ्रि प्रेस जर्नल'नं हे वृत्त दिलं आहे.
ATS ला मिळालेल्या माहितीनुसार सर्व स्टेडिअम तसेच खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर सामनाअधिकारी, अंपायर तसंच अन्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे. मॅचच्या दरम्यान हॉटेल ते स्टेडियमच्या मार्गात पार्किंगलाही मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष टीमला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Wednesday, March 23, 2022

बंडातात्यांची जीभ पुन्हा घसरली ; महात्मा गांधींबद्दल केले वादग्रस्त विधान ...

वेध माझा ऑनलाइन - नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींच्या अंहिसावादी विचारांनी लक्ष केलंय. महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी हुतात्मा राजगुरुंच्या स्मुर्तीस्थळावर केलं. तसंच, महात्मा गांधींचा म्हाताऱ्या म्हणून उल्लेखही त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने नाही तर 1942 क्रांतीकारक चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला. कुठतरी सांगितले जाते की देशाच्या स्वातंत्र्यासाठी 'साबरमती के संत तुन्हे कर दिया कमाला मिली हमें आजादी बिना खंड बिना ढाल' असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याची टीका कराडकरांनी केली.

क्रांतीकारक भगतसिंगाच्या मनात महात्मा गाधींची छाप होती. मात्र महात्मा गांधीजीचा अंहिसावाद भगतसिंगाच्या मनात ठसावला होता. आपल्या देशाला स्वातंत्र अंहिसक मार्गाने मिळवायचे हा भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. जालियनवाला वाला हत्याकांडाला गाधींनी समर्थन द्यायला नकार दिल्यानंतर भगतसिंग आणि गांधीजी यांच्यात नाराजी उभी राहिली, असंही कराडकर म्हणाले.

महात्मा गांधीजींना म्हाताऱ्याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही. त्यानंतर भगतसिंग क्रांतीकारक बनले. या दरम्यान लोकमान्य टिळकांची आठवण करुन देत या म्हाताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर 1 हजार वर्ष लागली असती, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं.

बंडातात्या कराडकरांनी हुतात्मा राजगुरुंच्या जन्मभुमीतून महात्मा गांधीच्या विचारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री योगींचा शपथविधी ; अदानी अंबानीसह 12 राज्याचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित ; 200 व्हीआयपी लोकांची लिस्ट तयार...विविध मंदिरे मठांचे महंत देखील राहणार उपस्थित...

वेध माझा ऑनलाइन - लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये  भाजपला प्रचंड यश मिळाले. यानंतर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथबद्ध होणार आहे. दुसऱ्यांदा युपीचा गड राखल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मेगा इव्हेंट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी लखनऊच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि ४९ कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल. 

२०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार

मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी २०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.

आता केंद्राच्या व राज्याच्या सर्व कार्यालयात मराठी अनिवार्य असेल ; मराठी राजभाषा विधेयक झाले मंजूर...

वेध माझा ऑनलाइन - अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये सामना रंगला आहे. आज सुद्धा गोंधळातच अधिवेशनाची सुरुवात झाली. मात्र, या गोंधळात मराठी राजभाषा विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मराठी राजभाषा विधेयकावर निवेदन सादर केले. त्यानंतर भाजप आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दर्शवला.

'सर्व आमदारांच्या सुचनांचे स्वागत करतो, पण गेल्यावेळी शासकीय प्राधिकरण हा शब्द त्या कायद्यात नव्हता त्यामुळे त्यांना बंधंनकारक नव्हते म्हणून आपण हा शब्द आता त्यात अंतर्भाव करत आहोत. अनेक मराठीबद्दल सजग असणारे लोक मला सुचना करतात. सर्व त्रुटी दुर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  मेट्रोच्या परिक्षा या फक्त इंग्रजी भाषेत घेतल्या गेल्या. कारण तसा नियम नव्हता. आता पळवाटा संपतील. आता केंद्राच्या राज्यातील कार्यालयापासून राज्यापर्यंत सर्व कार्यालयात मराठी ही अनिवार्य असेल' असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं.
'या विधेयकांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे मी तुम्हाला आश्वासित करतो. जिल्हा भाषा समिती ही सर्व सामान्य लोकांना तक्रार करण्यासाठी एक जागा असावी यासाठी तयार करण्यात आले आहे आणि जिल्हाधिकारी यांच्यावर ती प्रकरण तडीस लावण्याची जबाबदारी असले. त्यामुळे असे अंतर्गत वाद विवाद होण्याचे प्रकार घडणार नाही' असंही देसाई म्हणाले.

तर आमदार योगेश सागर यांनी मध्येच आक्षेप घेतला. 'मला कळत नाही की निवडणुक जवळ आली की लोकांना मराठीचा पुळका का येतो? माझी विनंती आहे की खालच्या अधिकाऱ्यापासून तर आयुक्तांपर्यंत सर्व नस्ती या मराठीत असाव्या. मुंबईत तर ठेकेदारांचे मेव्हने, पाहुणे, जावाई, भाचे हे गेल्या १० वर्षात महापालिकेत नोकरीला लागत आहेत. तेच महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचत आहे. उद्या जर फाईल मराठीत नसतील तर टेंडरही हेच भरतील' असं योगेश सागर म्हणाले.
तर, 'महाराष्ट्रात स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. सर्व सरकारी, महापालिका कार्यालयात कामकाजाची भाषा मराठी असेल पण यात शासकीय प्रयोजनाकरीता इंग्रजी भाषा वापरण्याची परवानगी असेल असं म्हटलं आहे. याचा अर्थ अधिकारी इंग्रजी वापरतील लोकांनी मात्र मराठीचा वापर करावा. त्या त्या कार्यालयातील प्रमुखांवर या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असेल.  जिल्हा मराठी भाषा समितीकडे काही तक्रार आली तर त्याचा निवाडा करेल असे तुम्ही म्हणत आहात. या समित्यांना निर्देष देण्यात येतील असे तुम्ही म्हणता उद्या माहितीचा अधिकार वापरून    याची माहिती समोर आली पाहिजे, असं भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले.

मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व निर्बंध हटवले जाणार ; केंद्र सरकारकडून करण्यात आली घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - देशभरात कोरोनाची लाट आता ओसरत चालली आहे. ठीक दोन वर्षांपूर्वीच आजच्या दिवशी देशभरात लॉकडाऊन सुरू झाला होता आणि अनेक निर्बंध लावण्यात आले होते. पण, आता कोरोनाची लाट ओसल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व निर्बंध हटवले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. फक्त मास्क आणि सहा फूट अंतर राखण्याची नियम लागू राहणार आहे.

केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने महामारी रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्चपासून कोरोना निर्बंध संपणार आहेत. दोन वर्षांनंतर देशातील जनतेची या निर्बंधातून सुटका झाली. आता फक्त सहा फुटाचे अंतर राखावे लागणार असून मास्क लावावा लागणार आहे.

दरम्यान, डेल्टाक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने भारतात दार ठोठावले असून महाराष्ट्र-दिल्लीसह 7 राज्यांमध्ये 568 प्रकरणांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, नोव्हावॅक्स कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. नोव्हॉवॅक्सने भारतात 12-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता जाहीर केली आहे.



Tuesday, March 22, 2022

"आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा'', असं म्हणाले वकील गुणरत्ने सदावर्ते ; राज्यात खळबळ...

वेध माझा ऑनलाइन - एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी आज मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संबोधित करताना खळबळजनक विधान केलं आहे. ''आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा'', असं गुणरत्ने सदावर्ते म्हणाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे वक्तव्य करण्याआधी पत्नी आणि वकील जयश्री पाटील यांनी सदावर्ते यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर सदावर्ते यांनी दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं आहे. सदावर्तेंच्या याच विधानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी अजूनही आंदोलन करत आहेत. तर गुणरत्ने सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या समुदायाला संबोधित करताना गुणरत्नं सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील उपस्थित होत्या. यावेळी सदावर्ते यांनी ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यात सदावर्तेंनी आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा अशीही घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या घोषणाबाजीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांविरोधात ईडीनं कारवाई केली आहे. यात नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा समावेश आहे. तसंच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. तसंच अनिल परब यांच्या निकटवर्तींच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर १९ बंगले असल्याच्या आरोपानं खळबळ उडवून दिली आहे. त्यात आता गुणरत्न सदावर्ते यांनी आता नंबर दिलीप वळसे पाटील यांचा असल्याचं विधान करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सदावर्तेंना यातून नेमकं काय सूचित करायचं आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 


अनेक टोलनाके बंद होतील ; सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोलनाक्‍यांची संख्या करणार कमी ; नितीन गडकरींची लोकसभेत घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल. तसंच, स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या 3 महिन्यांत लागू होणार आहे महामार्गावरचा प्रवास आगामी काळात स्वस्त होणार आहे. कारण सरकारला यासंबंधी काळजी वाटत असून त्यादृष्टीनं आराखडाही तयार करण्यात आला आहे. सरकार ठराविक अंतराच्या मर्यादेत एकदाच टोल वसूल करेल. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आहे.

 
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल. तसंच, स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या 3 महिन्यांत लागू होणार आहे.

अनेक टोलनाके बंद होतील

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोलनाक्‍यांची संख्या कमी करणार आहे आणि 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल. नितीन गडकरी म्हणाले की, 60 किमीच्या परिघात येणारे इतर टोलनाके येत्या 3 महिन्यांत बंद केले जातील.केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांना टोल भरावा लागणार नाही. त्यांना पास दिला जाईल. यामुळं महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला दिलासा तर मिळेलच; पण अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त होतील वास्तविक, महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचं उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांची नेहमीच मागणी असते की, त्यांना टोलमध्ये सवलत द्यावी. कारण, स्थानिक असल्यानं त्यांना सतत प्रवास करावा लागतो.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याची कोट्यवधींची संपत्ती ईडी ने केली जप्त...मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे ईडी च्या रडारवर ...राज्यात खळबळ...

वेध माझा ऑनलाईन - महाविकास आघाडी सरकारचे नेते ईडीच्या रडारवर असतानाच आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. श्रीधर पाटणकर  याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. 

श्रीधर पाटणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. 'पुष्पक ग्रुप'ची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून पुष्पक ग्रुपची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सदनिकांची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख रुपये इतके असल्याची माहिती समोर आली आहे.आतापर्यंत महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी, आयकर विभागाकडून छापेमारी करुन कारवाई करण्यात आली होती. पण आता थेट मुख्यमंत्र्यांचे मेहुणेच ईडीच्या रडारवल आल्याने चर्चांना उधाण आले असून एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर चतुर्वेदी हा एन्ट्री ऑपरेटर असलेल्या नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून 30 कोटींचं कर्ज अनसिक्युअर्ड लोन श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शेल कंपनीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशांच्या माध्यमातून श्रीधर पाटणकर यांनी ठाण्यातील हे 11 घरांची खरेदी केली असल्याचा आरोप आहे.

आज, उद्या राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता ;

वेध माझा ऑनलाईन - मार्च महिना सुरू होताच महाराष्ट्रासह मध्य भारतात अनेक ठिकाणी सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. ठाण्यात कमाल तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या शरीराची लाहीलाही झाली होती.दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता असूूून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार अशी शक्यता आहे

दरम्यान, अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची घट झाली. पण राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 20 अंशाहून अधिक नोंदला गेला. तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात देखील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. दरम्यान आज, उद्या ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार अशी शक्यता आहे. 


कराडचे डॉ नचिकेत वाचासुंदर "अक्कलकोट भूषण' पुरस्काराने सन्मानित...आयुर्वेद व पंचकर्मच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल झाला सन्मान...


वेध माझा ऑनलाइन - 
येथील सुपरिचित पंचवेद पंचकर्म आयुर्वेदिक हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ नचिकेत वाचासुंदर याना अक्कलकोट भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे अक्कलकोट येथील हुतात्मा अपंग बहुद्देशीय संस्थेच्यावतीने आयुर्वेद व पंचकर्मच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  डॉ  वाचासुंदर यांचा हा सत्कार करण्यात आला आहे

अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ मठाचे प पू अण्णा महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ वाचासुंदर याना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वटवृक्ष संस्थांनचे अध्यक्ष महेश इंगळे तसेच अग्निहोत्र फाउंडेशनचे डॉ पुरुषोत्तम राजिमवाले आणि अपंग बहुद्देशीय संस्थेचे डॉ सुनील फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक सांस्कृतिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यांनाही यावेळी गौरवण्यात आले 

 डॉ नचिकेत वाचासुंदर यांनी आयुर्वेद व पंचकर्माच्या माध्यमातून हजारो रुग्णांची यशस्वी उपचारसेवा करीत कराड परिसर तसेच ग्रामीण भागात आयुर्वेद व पंचकर्माचा प्रसार व प्रचार केला आहे त्यांनी आयुर्वेद विद्यार्थी व वैद्यांसाठी व्यवहारीक पंचकर्म विज्ञान या ग्रंथाची निर्मिती करून आयुर्वेद व पंचकर्म विषयामध्ये मोठे काम देखील केले आहे या एकूणच कार्याची दखल घेत डॉ वाचासुंदर त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे

स्वामी समर्थांच्या पवित्र आणि पावन भूमीत मिळालेला पुरस्कार म्हणजे साक्षात स्वामी समर्थांचा आशिर्वादच असल्याची  भावना यावेळी डॉ वाचासुंदर यांनी बोलून दाखवली

दैनंदिन वापरात लागणाऱ्या उत्पादनांच्या किमतीत वाढ ; अनेकांचं आर्थिक गणित बिघडलं ; येत्या काळात गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार!

वेध माझा ऑनलाईन - मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी 31 मार्च हा केवळ कोणत्याही आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसतो, तर आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक कामं पूर्ण करण्याची अंतिम मुदतही असते. या महिन्यात सर्व जण आपले वर्षभराचे हिशेब पूर्ण करून पुढच्या वर्षातल्या आर्थिक गुंतवणुकीचा प्लॅन करत असतात. मात्र, इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात महागाई वाढत असून अनेकांचं शेवटच्या महिन्यातलं आर्थिक गणित फिस्कटलं आहे. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अमूल पराग आणि नंतर मदर डेअरीने दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढवले. मध्य प्रदेशातल्या सांची या कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे पाच रुपयांची वाढ केली आहे. दूध हा रोजच्या वापरातला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.
22 मार्चपासून एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये झाली आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर पहिल्यांदाच एलपीजी सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे.
तेल कंपन्यांनी अलीकडेच घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. रेल्वे, राज्य मार्ग परिवहन महामंडळं, बस ट्रान्सपोर्टर्स, मॉल्स आणि संरक्षण क्षेत्रातल्या आस्थापना यांचा घाऊक ग्राहकांमध्ये समावेश होतो. या दरवाढीमुळे येत्या काळात या सर्व घटकांशी संबंधित सेवा महागण्याची भीती आहे.
या महिन्यात नेस्लेने मॅगीच्या छोट्या पॅकची किंमत 12 रुपयांवरून 14 रुपये केली आहे. कंपनीने मॅगीच्या सर्व प्रकारच्या पॅकेट्सच्या किमतीत वाढ केली आहे. यासोबतच कंपनीने चहा, कॉफी आणि दुधाच्या दरातही वाढ केली आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीनेही उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.सर्वसामान्य माणसाला दैनंदिन वापरात लागणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढल्याने अनेकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून येत्या काळात गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची झाली वाढ ; दरवाढीमुळे सामान्य लोकांना बसणार झळ...

वेध माझा ऑनलाइन - आज देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य लोकांना झळ बसणार आहे. तर, दुसरीकडे काही ग्राहकांना दिलासादेखील मिळाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी आयओसीने व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या गॅस सिलेंडर दरात कपात केली आहे. 

 व्यावसायिक एलपीजी सिलेंडर नवे दर

मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 1963 रुपये इतका होता. आता हाच दर 1954 रुपये झाला आहे. कोलाकातामध्ये याआधी 2095 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर 2087 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईतही व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात घट झाली आहे. चेन्नईत याआधी 2145 रुपयांना हा सिलेंडर मिळत होता, हा सिलेंडर आता 2137 रुपयांना मिळणार आहे. 

घरगुती वापराचा एलपीजी महागला

देशात घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ 

आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते.

भाजप बरोबर पुन्हा युती नाही ; खासदार संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

वेध माझा ऑनलाईन -  भाजपने शिवसेनेच्या बाबतीत जे वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती. भाजप ज्या पद्धतीने केंद्रीय संस्थांचा वापर करून त्रास देत आहे. त्यामुळे संबंध ताणले आहे, त्यामुळे परत भाजप-सेना युतीच्या प्रश्न येत नाही' शिवसेना इतर पक्षासारखे नाही एकदा भूमिका घेतली घेतली, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसोबत युतीची चर्चा फेटाळून लावली.

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केले आणि  संघाने स्वत: मुस्लीम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. त्यामुळे पडळकर किंवा भाजप नेते ­­मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का? असा परखड सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.
'दहशत शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. शिवसेना असाा पक्ष आहे, तिथे हे शब्द चालत नाही. खोटे आरोप करणे हा बॉम्ब आहे का?  मी ईडीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं 13 पानी पुराव्यासह सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे. तो बॉम्ब नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.

Monday, March 21, 2022

आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं ; तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं; आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ...

वेध माझा ऑनलाइन - आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची  दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.  


उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरनं किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.  पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतरही देशात काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यानंतर क्रूड ऑईलच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

गोव्याचा मुख्यमंत्री ठरला!

वेध माझा ऑनलाईन - गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत प्रमोद सावंत यांच्याकडे यापुढेही राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच सावंत हे गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. गोव्यातील भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. हे सर्वांनी मान्य केले. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आल्याच्या 11 दिवसांनंतर ही बैठक झाली. भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन हे भाजप विधिमंडळ पक्षनेते निवडीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आज दुपारी येथे दाखल झाले.

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे तर, राज्याच्या सचिवपदी विक्रम पावसकर...


वेध माझा ऑनलाईन - 
भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटिल यांनी ही  घोषणा केली
जिल्ह्याचे पूर्व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर याना जिल्ह्याध्यक्ष पदावरून राज्याच्या प्रदेश सचिव पदावर बढती देण्यात आली आहे काही दिवसांवर येथील नगरपालिकासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत या पार्शवभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजपने केलेल्या या पदाधिकारी बदलांची जोरदार चर्चा आहे

नामदार शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थानासमोर जमावाकडून गोंधळ...

वेध माझा ऑनलाईन - साताऱ्यातील पोवई नाक्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आज, सोमवारी जमावाकडून गोंधळ घालण्यात आला. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारच्या सुमारास गृहराज्यमंत्री देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थानासमोरील रस्त्यावर काही लोक गोंधळ घालू लागले. जोरात आरडाओरडा सुरू झाला. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीलाही व्यत्यय आला. गोंधळ सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान, एका व्यक्तीने विषारी औषध खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे.  त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशीही माहिती मिळाली. याबाबत सायंकाळी चारपर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला होता.  याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

शरद पवार मलिक यांचे खाते इतर मंत्र्यांकडे सोपवणार ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पवारांचा फोन ...

वेध माझा ऑनलाइन - मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. तर दुसरीकडे भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांचे खाते इतर मंत्र्यांकडे सोपवण्याची तयारी केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी नवाब मलिक यांच्या मंत्रालयातील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

नवाब मलिक यांच्या खात्याची जबाबदारी देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी भूमिका पवारांनी घेतली आहे.

याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

का घेतला पवारांनी निर्णय?


नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांना 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या खात्यातील काम मागे पडू नये म्हणून त्यांच्या खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकड देण्यात यावी अशी भूमिका पवारांनी घेतली.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. नवाब मलिक उपलब्ध नसल्यानं  2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव हे नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहे.  नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्यानं त्यांची जबाबदारी तात्पुरती दिली जाणार आहे.  त्यांच्या खात्यांची जबाबदारी आणि पालकमंत्रिपद, पदभार इतर मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.  तसंच, 'नवे पालकमंत्री म्हणून परभणीसाठी धनंजय मुंडे याचे नाव देण्यात आले आहे. तर गोंदियासाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव दिले आहे, अशी माहिती मिळत आहे

चीनमध्ये 133 जणांना घेऊन जाणारं प्रवासी विमान झाल क्रॅश ; अनेकांचा बळी गेल्याची भीती...

वेध माझा ऑनलाइन - चीनमध्ये 133 जणांना घेऊन जाणारं एक प्रवासी जेट क्रॅश झालं आहे यात अनेकांचा बळी गेल्याची भीती आहे. स्टेट ब्रॉडकास्टर सीसीटीव्हीने सोमवारी ही माहिती दिली. अपघातातील मृतांची संख्या आणि अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सीसीटीव्हीनुसार, बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराजवळील ग्रामीण भागात कोसळलं. यानंतर डोंगराळ ठिकाणी आग लागली. घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे विमान 3 वाजेपर्यंत नियोजीत स्थळी  पोहोचणार होतं. मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली. ज्याठिकाणी हे विमान कोसळलं त्या परिसरात भीषण आग लागली. अशा स्थितीत अपघातातील मृतांचा आकडा जास्त असल्याचं मानलं जात आहे. बोइंग ७३७ मॉडेलची विमानं यापूर्वीही अनेकदा अपघाताचे बळी ठरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते. या दुर्घटनेत किती जण वाचले, किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. अपघातग्रस्त विमान चीनच्या चायना इस्टर्न एअरलाइन्सचं आहे.ज्या विमानाचा अपघात झालं आहे ते केवळ साडेसहा वर्ष जुनं होतं. जून 2015 मध्ये ते एअरलाइन्सने ताब्यात घेतलं होतं. MU 5735 मध्ये एकूण 162 जागा होत्या, त्यापैकी 12 बिझनेस आणि 150 इकॉनॉमी क्लास होत्या.