वेध माझा ऑनलाइन - उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा जागांवर मतमोजणी सुरू असून भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल आहे. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे.
कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर येणारे पहिले मुख्यमंत्री
उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील, जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असं घडलेलं नाही. याआधी यूपीमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत. मात्र त्यापैकी एकानंही पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे.
5 वर्षे पूर्ण करून सत्तेत परत वापसी
2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाला सत्ता देणार असून उत्तर प्रदेशच्या इतिहासातील असे पहिले मुख्यमंत्री बनतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली कोणताही पक्ष 5 वर्षे पूर्ण करून सत्तेत वापसी करत आहे.
योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि गोरखपूरमधून निवडणूक रिंगणात आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर एखादा नेता मुख्यमंत्री होणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये मुलायमसिंह यादव आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते. यानंतर मायावती, अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ स्वत: विधान परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते.
No comments:
Post a Comment