Sunday, March 6, 2022

नवाब मलिक यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही ; पक्ष प्रवक्ता म्हणून त्यांनी भाजपचा खोटा चेहरा लोकांसमोर आणला...

वेध माझा ऑनलाइन - राज्य शासनाचे मंत्री नवाब मलिक हे भाजप विरोधात प्रवक्ते म्हणून चांगलं काम करत होते भाजपचा चेहरा उघडा पाडत होते म्हणून त्यांना ईडी च्या माध्यमातून त्रास दिला गेला त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सूतोवाच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथील आयोजित पत्रकार परिषदेत केले यावेळी नगरसेवक अप्पा माने इंद्रजीत गुजर फारूक पटवेकर यांच्यासह जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण युवा नेते जावेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते

ते पुढे म्हणाले.....
कराडमधील बांधकामाँविषयीची अनिश्चितता संपली आहे आमच्या विमानतळविषयी पाठपुराव्याला यश आले आहे यापुढे भविष्यात येथील विमान तळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे विमानतळ विकासामुळे येथील सगळ्याच विकासनशील ड्रीष्टीकोनाला चालना मिळून परिसर प्रगत होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले
ओबीसी विषयक विधेयक आमचे सरकार उद्या सोमवारी विधिमंडळात मांडणार आहे मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर हे विधेयक मांडले जाईल केंद्र सरकारने याविषयी डेटा देण्याबाबत केलेला बेजबाबदारपणा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले
येथील शनिवार पेठेतील जळलेल्या वस्तीबाबत पुढे काय फॉलो अप झाला... याबाबत बोलताना ते म्हणाले प्रशासकीय लेव्हलवर त्याचे रिपोर्टइंग होईल त्यानुसार लवकरच त्यांना मदत मिळेल त्यांचे पुनर्वसन होण्याबाबत मागणी होत आहे त्याबाबतही विचार सुरू आहे

No comments:

Post a Comment