वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यांना जामीन देखील मिळण्यास विलंब होत आहे. मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे. विरोधकांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राज्यात घडणाऱ्या या सध्याच्या विविध घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांनी यावेळी भाजपचे थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी आहे. तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी काही विशिष्ट लोकांसोबत एकत्र बसून जेवण केल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment