Friday, March 4, 2022

पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्ब स्फोट ; 30 जण ठार झाल्याची भीती ; आत्मघातकी पथकाने स्फोट केल्याचं झालं उघड...

वेध माझा ऑनलाइन - पाकिस्तानातल्या नैर्ऋत्येकडचं मोठं शहर आज दुपारी बाँबस्फोटाने हादरलं. पेशावरच्या मशिदीत ऐन शुक्रवारच्या नमाजाच्या वेळीच जबरदस्त स्फोट झाला. यात किमान 30 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. सुसाईड बॉम्बर ने हा हल्ला केल्याचं उघड झालं आहे. या आत्मघातकी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

पेशावरच्या कोचा रायसलदार या प्रसिद्ध गजबजलेल्या भागात एका मशिदीत स्फोट झाला. या वेळी नमाजपठण सुरू असल्याने मशिदीत गर्दी होती. पाकिस्तानच्या जिओ न्युज ने दिलेल्या बातमीत किमान 30 जखमी आणि 5 ठार झाल्याचं म्हटलं आहे. पण ए पी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 30 जण ठार झाल्याची भीती आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार काही अतिरेकी सुरुवातीला मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पोलिसांनी अडवलं आणि चकमक उडाली. पण एक दहशतवादी शिताफीने मशिदीत घुसला. त्यानेच स्वतःबरोबर आणलेल्या स्फोटकांनी मशीद उडवली. या आत्मघातकी हल्ल्यात दहगशतवादी ठार झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment