Monday, March 14, 2022

माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी ...निलेश राणे यांनी केलं ट्विट; गुन्हा दाखल झाल्यावरही राणे आपल्या वक्तव्यावर ठाम...


वेध माझा ऑनलाइन - 
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपूत्र हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. यापूर्वी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांच्या दोन्ही पुत्रांवर गुन्हा दाखल झाला होता. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे त्यांना भोवलं आहे. राणे बंधूंवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

''माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी म्हणतच राहणार. शरद पवार हे दाऊदची व्यक्ती आहे याबाबत मला संशय आणि राहणार'', असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. गुन्हा दाखल झाल्यावरही ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसतात.

नेमकं काय आहे प्रकरण? 

निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जाणीपूर्वक हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून दंगल घडेल असं वक्तव्य केलं. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचं वक्तव्य करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला, अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी गंभीर दखल घेत शनिवारी रात्री उशिरा राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणेंचं वक्तव्य नेमकं काय? -अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. कारण ते मराठा समाजाचे होते. पण, नवाब मलिक मुस्लीम समाजातून येतात. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. हे सर्व दाऊदच्या सांगण्यावरून होत असल्याचं मोठं वक्तव्य नितेश राणे यांनी आझाद मैदानावर केलं होतं. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत संबंध आहेत. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, असा आरोपही नितेश राणे यांनी केला होता.

No comments:

Post a Comment