Monday, June 5, 2023

कराडचा ओंकार जालिंदर शिंदे एमपीएससी परीक्षेत राज्यात ९ वा ; कराडच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा ; ओंकारचे सर्वत्र होतय अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाइन । कराड येथील ओंकार जालिंदर शिंदे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात ९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सहाय्यक नगर रचनाकार अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. 

त्यांच्या निवडीने कराड परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.पाच वर्षाच्या अथक परिश्रमानंतर न खचता त्यांनी एमपीएससी २०२२ च्या परीक्षेत भरघोस यश मिळवत, तसेच आयोगा कडून घेण्यात येणाऱ्या मुलाखतीमध्ये सर्वाधिक गुण घेऊन, सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी -१ हे पद मिळवले आहे.

ओंकार शिंदे याने गव्हरमेन्ट कॉलेज मधून बी ई सिव्हील शिक्षण पूर्ण केले आहे त्याने 2022 साली एमपीएससी अंतर्गत परीक्षा दिली त्यात सर्वाधिक गुण मिळवत राज्यात 9 वा क्रमांक क्रमांक मिळवला अथक परिश्रम करत ओंकार ने हे यश मिळवले आहे कराड व परिसरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे

No comments:

Post a Comment