Wednesday, June 7, 2023

शंकर खंदारे कराडचे नवे मुख्याधिकारी...लवकरच होणार कामावर रुजू...

वेध माझा ऑनलाइन । कराडचे नवे मुख्याधिकारी म्हणून शंकर खंदारे यांची नेमणूक झाली आहे मावळते सी ओ रमाकांत डाके यांची कराडहुन बदली होऊन बरेच दिवस उलटून गेल्यानंतर आज बुधवारी शंकर खंदारे यांची कराडचे नवे सी ओ म्हणून ऑर्डर आली आहे
याबाबत वेध- माझा शी बोलताना खंदारे म्हणाले मी मूळचा साताऱ्याचा आहे सध्या वसई-विरार येथे काम पहात आहे कराड चे नूतन  सी ओ म्हणून मला ऑर्डर आली आहे मात्र कधीपासून मी कराडला रुजू होईन हे आताच सांगू शकत नाही मला वरिष्ठांशी बोलूनच ठरवावे लागेल 

एकूणच सी ओ डाके यांची बदली झाल्यानंतर सौ दळवी कराड याठिकाणी हंगामी सी ओ म्हणून तात्पुरत्या चार्ज घेऊन कार्यरत झाल्या होत्या मात्र त्यानंतर काही दिवसातच शंकर खंदारे हे वसई-विरार वरून कराडचे नवे सी ओ म्हणून आता रुजू होणार आहेत आजच त्यांना याबाबत ऑर्डरही झाली आहे

No comments:

Post a Comment