Thursday, June 8, 2023

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला फडणवीसांना सल्ला ; काय म्हणाल्या ...

वेध माझा ऑनलाइन ।  दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मरीन लाईन्स येथील महिलांच्या वसतीगृहात एका तरुणीची हत्या झाली, आज मीरा रोड परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी राज्यातील गुन्हेगारीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीवरुन ट्विट करत कारवाईची मागणी केली. मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.
गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असा सल्ला दिला. तसेच या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

No comments:

Post a Comment