वेध माझा ऑनलाईन। उच्च शिक्षण घेतलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना नोकरी पासून डावलण्यासाठी क्रिमिलियरची अट लावली जाते व नोकरीपासून त्यांना वंचित ठेवले जाते हे सत्य आहे. राज्य सरकारने ओबीसी साठीची क्रिमिलियरची अट काढून टाकावी व ओबीसी समाजावरील अन्याय थांबवावा असे प्रतिपादन सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी केले
कराड शहर ओबीसी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व कौतुक सोहळ्यात ते बोलत होते
यावेळी सातारा जिल्हा महिला आघाडीच्या
अध्यक्ष सौ सुनीता लोहार जिल्हा कार्याध्यक्षा शांता जानकर,तसेच क्षीरसागरसाहेब चंद्रकांत कुंभार अक्षय कुरकुले, नथुराम कुंभार, विनायक गायकवाड ,सौ माळी, सतीश बेडके रमेश वास्के मंगेश वास्के मजनुद्दीन शेख तसेच विद्यार्थी पालक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते
दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक अभिजीत दळवी यांनी केले त्यांनी दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आपली आवड व आपले गुण पाहून पुढील शिक्षणाची निवड करावी असे यावेळी सांगितले तर प्राध्यापक हेमंत शेटे यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षाच्या काळात कोणती आव्हाने आहेत याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माणिक बनकर यांनी केले. स्वागत दत्तात्रय तारळेकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष भानुदास वास्के यांनी केले गणेश हिंगमिरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment