वेध माझा ऑनलाईन। भाजपाच्या मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या कालच्या फ्लाईंग किसच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. याबाबत भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अघ्यक्षांकडे तक्रारही दाखल केली. या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचं इतकं घाण प्रकरण समोर आलं, तरीही स्मृती इराणी यावर काहीच का बोलल्या नाहीत, असा सवाल खैरे यांनी केला आहे.
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, “काल राहुल गांधींनी सभागृहात फ्लाइंग किस दिला. यामुळे आमच्या भगिनी स्मृती इराणी यांना मिरची लागली. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे, त्यामुळे मी आमच्या भगिनींना विचारू इच्छितो की, किरीट सोमय्यांचं इतकं घाण आणि वाईट प्रकरण समोर आलं. त्यावर तुम्ही काहीच बोलले नाहीत. किरीट सोमय्यांचा तो व्हिडीओ जवळपास ५० कोटी लोकांनी पाहिला आहे असेही खैरे म्हणाले ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.
No comments:
Post a Comment