वेध माझा ऑनलाईन ; दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यापोटी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या वतीने १ लाखाची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दल चांगलेच खडबडले आहे जिल्ह्यातील औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि सहाय्यक फौजदार बापूसाहेब नारायण जाधव यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उज्जवल वैद्य यांच्या माहितीनुसार, तक्रारदारावर परमिट रूममधून दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने दीड लाखांची लाच मागितली होती. एक लाख रुपयांवर तडजोड झाली औंधच्या जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण परिसरात लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली आणि सहाय्यक फौजदाराला रंगेहाथ पकडण्यात आले.
No comments:
Post a Comment