वेध माझा ऑनलाईन। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये पुणे विभागामध्ये कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी ग्रामपंचायतींचे सरपंच प्रदिप पाटील,उपसरपंच नरहरी जानराव माजी जि.प.सदस्य सागर शिवदास व सर्व ग्रामपंचायत सदस्य. ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले आहे.
बनवडीचा घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. जिल्ह्यासह राज्यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी या प्रकल्पास भेट दिली आहे. हा प्रकल्प पाहून अनेक गावांनी अशा पध्दतीचे घनकचरा प्रकल्प उभारले आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला आर्थिक स्थेर्यही मिळत आहे. त्यामध्ये गांडूळ खतापासून मिळणारे उत्पन्न, सौर ऊर्जा द्वारे होणारा पाणी पुरवठा यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment