वेध माझा ऑनलाईन। चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना मलकापुरातील जगदाळे मळा मार्गावरील कच्छी अपार्टमेंटमध्ये घटना घडली आहे याबाबत मेहबूब पैगंबर बैग यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मलकापूर येथील जगदाळे मळा मार्गावर असलेल्या कच्छी अपार्टमेंटमध्ये मेहबूब बैग हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. ते फिरता व्यवसाय करतात.मंगळवारी काही कामानिमित्त ते कुटूंबासह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद होते. दरम्यान, रात्री चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे दागिने त्यांनी लंपास केला चोरट्यांनी चाळीस हजाराची रोकडही लंपास केली आहे.
दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कºहाड शहर पोलीस त्याठिकाणी पोहोचले व घटनास्थळाचा पंचनामा करुन अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
No comments:
Post a Comment