वेध माझा ऑनलाईन। पुण्याच्या मेट्रो सेवेची सुरुवात मंगळवारी झाली मंगळवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवा कंदील दाखवला कराड तालुक्यातील येळगावची अपूर्वा अलाटकर की युवती या मेट्रो रेल्वेची चालक आहे अपूर्वाच्या या कर्तृत्वाने तिने कराड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे
पुण्याच्या मेट्रो सेवेची सुरुवात मंगळवारी झाली विशेष म्हणजे या मेट्रो ट्रेनची ऑपरेटर अपूर्वा अलाटकर ही मुलगी आहे... मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे याचे आणखी एक उदाहरण म्हणता येईल... अपूर्वा अलाटकर ही कराड तालुक्यातील येळगावची कन्या असून तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेट्रोसाठीच्या विविध पदासाठी अर्ज केला होता...त्यानुसार तिची निवड झाली तिच्याकडे वनाज स्थानकाची स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी आहे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवा कंदील दाखवला अन... अपूर्वाने मास्क ऑन कीचा वापर करत मेट्रो मार्गस्थ केली... अपूर्वा अलाटकर ही प्रमोद अलाटकर यांची कन्या आहे... ते मूळचे कराड तालुक्यातील येळगावचे असून नोकरी निमित्ताने ते साताऱ्यात राहतात... अपूर्वा अलाटकरच्या एकूणच या कर्तृत्वामुळे कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे... अपूर्वाच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा...
No comments:
Post a Comment