Sunday, August 6, 2023

चीनच्या शेडोंग प्रांतात भूकम्पाचा जोरदार धक्का : 126 इमारती जमीनदोस्त झाल्या


वेध माझा ऑनलाईन।चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे मोठा हाहाकार माजला आहे. इमारती कोसळल्या. अनेकजण जखमी झाले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.5 इतकी मोजण्यात आली आहे. रविवारी सकाळी लोक झोपले असताना भूकंप झाला. लोक गाढ झोपेत होते. भूकंपाचा केंद्रबिंदू देझोऊ येथे होता. केंद्राची खोली फक्त 10 किलोमीटर होती. 126 इमारती जमीनदोस्त झाल्या. तर 21 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बीजिंगपासून 300 किलोमीटर अंतरावर होता. चीनी भूकंप नेटवर्क केंद्रांचे म्हणणे आहे की भूकंपाची तीव्रता 5.5 होती, परंतु अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने रिश्टर स्केलवर 5.4 तीव्रता दिली आहे. चीनी सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोक धावताना दिसत आहेत. इमारती, बाउंड्री वॉल कोसळल्याने डेब्रिज रस्त्यावर पसरले होते. अंधारात जीव वाचवण्यासाठी धावणारे लोक या ढिगाऱ्यांवर आदळले आणि पडून जखमी झाले. शहरात बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

भूकंपाची तीव्रता पाहून गाड्या थांबवण्यात आल्या. रेल्वे ट्रॅकची पाहणी केली जात आहे. त्याचा परिणाम रस्त्यांवरही झाला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होता. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाचे म्हणणे आहे की, हे केंद्र पृष्ठभागापासून फार खोल नव्हते. अशा स्थितीत आणखी विध्वंस होण्याची शक्यता आहे. धोक्यामुळे गॅस पुरवठाही बंद करण्यात आला आहे. पाइपलाइनच्या तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. अनेक भागात पाइपलाइन खराब झाली आहे.

No comments:

Post a Comment