वेध माझा ऑनलाईन। केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी देशभरातील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठकही झाली. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेदेखील या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमित शाह यांनी अजित पवार यांच्याबद्दल एक मजेशीर विधान केले.
अमित शाह जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी उपस्थित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत केले. त्यानंतर भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी अजितदादांचा उल्लेख केला. शाह म्हणाले, "अजितदादा उपमुख्यमंत्री बनल्यावर प्रथमच आले आहेत आणि मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित आहे. मी अजितदादांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, तुम्ही बऱ्याच काळानंतर अखेर योग्य जागी बसलेला आहात. हीच जागा तुमच्यासाठी योग्य होती, पण तुम्ही यायला बराच उशीर केलात."
No comments:
Post a Comment