वेध माझा ऑनलाईन। वाई येथे आरोपींवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. न्यायालय परिसरात हा गोळीबार झाल्याचे कळताच वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, रा. भुईंज आणि निखिल तसेच अभिजीत शिवाजी मोरे रा. गंगापुरी, वाई यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आहे. दोन फायर करण्यात आले. मात्र, कोणीही जखमी झालेले नाही. गोळीबाराच्या घटनेने वाई न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.
No comments:
Post a Comment